Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! राज्यसेवा मुख्य परीक्षेदरम्यान गैरप्रकार, एकावर गुन्हा दाखल

धक्कादायक! राज्यसेवा मुख्य परीक्षेदरम्यान गैरप्रकार, एकावर गुन्हा दाखल

औरंगाबाद | Aurangabad

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या (mpsc) ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२’ च्या औरंगाबाद केंद्रावर गैरप्रकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

या मुख्य परीक्षेदरम्यान एक उमेदवार ब्लूटूथचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित उमेदवारावर पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती आयोगाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून उघड केली.

आयोगाने सांगितले आहे की, ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ करिता औरंगाबाद येथे परीक्षेच्या वेळी ब्लू टूथ जवळ बाळगल्याबद्दल सचिन नवनाथ बागलाने या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

- Advertisment -

ताज्या बातम्या