Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरमाळीवाडा बसस्थानक परिसरामध्ये मनपाची अतिक्रमण मोहीम

माळीवाडा बसस्थानक परिसरामध्ये मनपाची अतिक्रमण मोहीम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कापड बाजारातील दोन व्यापार्‍यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर बाजारपेठेसह सर्वच भागातील अतिक्रमण महापालिकेकडून काढण्यात येत आहे. आयुक्त डॉ. पंकज जावळे दोन दिवसांपासून स्वत: रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान मंगळवारी महानगरपालिका व महसूल प्रशासनाच्यावतीने माळीवाडा बस स्थानक परिसरामध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. जावळे यांच्यासह प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार शिंदे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापार्‍यांवर हल्ला झाल्यानंतर अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मनपा प्रशासनाने शनिवारपासून बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. रविवारसह सोमवार व मंगळवारीही कारवाई करण्यात आली. हातगाड्या, टपर्‍या, बॅनर, प्लास्टिक व पत्र्याचे शेड काढण्यात येऊन अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या