Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगाव: अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली

मालेगाव: अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे (Illegal business) फोफावल्याने गुन्हेगारी (criminality) वाढली असून खून (murder), प्राणघातक हल्ले (Deadly attacks), लुटमार, टोळी युध्द तसेच गुंडांव्दारे जमीनींवर अवैध कब्जा करण्याचे प्रकार वाढले आहेत.

- Advertisement -

अप्पर पोलीस अधिक्षक (Upper Superintendent of Police) व काही पोलीस निरीक्षकांच्या कृपेमुळे हे अवैध धंदे वाढून शहरात गुंडांव्दारे शांतता वेठीस धरली जात आहे. राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शहरातील गुन्हेगारीने कळस गाठला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आ. शेख रशीद (NCP’s former MLA Sheikh Rasheed) यांनी येथे बोलतांना केला.

येथील हजारखोलीतील राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. शेख रशीद यांनी पोलीस अधिकार्‍यांसह मनपा प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी (Municipal Administrator and Commissioner Bhalchandra Gosavi) यांच्या कारभारावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले.

अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi) यांच्यासह मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अनागोंदी कारभाराविरूध्द मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) व महसूल मंत्र्यांची (Revenue Minister) पुढच्या आठवड्यात भेट घेवून तक्रार करणार आहोत. या तक्रारीची दखल घेत कारवाई न झाल्यास शहरात व्यापक जनआंदोलन (agitation) छेडणार असल्याचा इशारा शेख रशीद यांनी पुढे बोलतांना दिला.

शहरात गत काही महिन्यांपासून अवैध धंदे व गुन्हेगारीने (Illegal business and crime) कळस गाठला आहे. 40 वर्षापासून आपण शहरात राजकारण (poitics) करत आहोत परंतू इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व अवैध धंदे वाढल्याचे दिसून आले नव्हते. कुत्तागोळीसह नशेच्या पदार्थाची मुक्तहस्ते विक्री होत असल्याने तरूण व्यसनाधीन होत गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत.

अवैध धंद्यांतील वर्चर्स्वासाठी गुंडांचे टोळीयुध्द सुरू झाल्याने भररस्त्यावर खुनाच्या (murder) तसेच प्राणघातक हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गुंडांव्दारे जमीनींवर अवैधरित्या कब्जा केला जात आहे. हे धाडस पोलिसांशी मिलीभगत असल्यामुळेच होत आहे. आयेशानगर पोलीस ठाण्याचा अपवाद वगळता इतर सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत

अधिकार्‍यांचा गुन्हेगारीवर वचक संपुष्टात आल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप करीत शेख रशीद यांनी पोलीस अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis) यांना निवेदन (memorandum) देत आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा प्रशासकांचा अनागोंदी कारभार

मनपा प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभारामुळे शहराच्या विकासाचा खेळखंडोबा होत असल्याचा आरोप माजी आ. शेख रशीद यांनी यावेळी बोलतांना केला. आयुक्त गुरूवारी मनपात येतात व शुक्रवारी निघून जातात. शासन नियुक्त अधिकार्‍यांना कुठलेही अधिकार दिलेले नसल्याने सर्व विकासकामे खोळंबली आहेत.

काही नगरसेवक अधिकार्‍यांच्या मिलीभगतमुळे नित्कृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. जनरल फंडाच्या कामामध्ये दहा टक्के मागितले जात असल्याने विकासकामांचा दर्जा खालावला आहे. अतिक्रमणांसह सर्व समस्या जैसे थे असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री व नगरसचिवांना भेटून आयुक्तांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे शेख रशीद यांनी सांगितले.

मंत्री भुसेंचे मनपावर अधिक लक्ष

गौण खनिजमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनानेच रूग्णालयांसाठी मानधनावर 65 सेवकांची नियुक्ती आयुक्तांतर्फे केली गेली. या सेवक भरतीची गोपनीयता पाळली गेल्याने ती कशा पध्दतीने झाली हे उघड झाले आहे. या भरतीत अल्पसंख्यांक समाजावर देखील अन्याय केला गेला आहे. मंत्रालयापेक्षा मनपावर मंत्री भुसे अधिक लक्ष ठेवून असल्याची टिका शेख रशीद यांनी यावेळी बोलतांना केली.

बाह्य मतदार संघाचे मंत्री भुसे हे आमदार आहेत. मात्र ते सोयगाव पुरते मर्यादित झाल्याचे दिसून येत आहे. रमजानपुरा, दरेगाव, म्हाळदे, सायने या गावांकडे भुसेंनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करीत शेख रशीद पुढे म्हणाले, गिरणा पूल, तळवाडे साठवण तलाव वाढीव जागा आदी अनेक विकासकामे आमच्या कारकिर्दीत झाली. परंतू त्याचे श्रेय भुसे घेत आहेत.

शहरात भुसेंमुळे नियुक्त झालेले अधिकारी अनागोंदी कारभार करत असल्याने त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना समक्ष भेटून करणार आहोत. या भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास शहरात व्यापक जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेख रशीद यांनी शेवटी बोलतांना दिला. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी गटनेते असलम अन्सारी, शकील बेगसह पदाधिकारी उपस्थित होते.

मनपा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल

आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर व सर्व जागा लढणार असल्याची माहिती शेख रशीद यांनी दिली. राज्यात महा आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर स्वतंत्र निर्णय आम्ही घेवू शकतो. यासाठी पक्षाची परवानगी घेवूनच मनपाच्या सर्व जागा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेबरोबर कुठल्याही परिस्थितीत हातमिळवणी केली जाणार नाही. वेळ आल्यास विरोधी बाकावर बसू मात्र सेनेची साथ नाही. आमची मैत्री असली शिवसेनेबरोबर होती, नकली शिवसेनेबरोबर युती करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे शेख रशीद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या