Saturday, April 27, 2024
HomeनाशिकAPMC Election 2023 : मालेगाव बाजार समितीवर कर्मवीर पॅनलची सत्ता; पालकमंत्र्यांच्या वीस...

APMC Election 2023 : मालेगाव बाजार समितीवर कर्मवीर पॅनलची सत्ता; पालकमंत्र्यांच्या वीस वर्षाच्या सत्तेला हादरा

मालेगाव | Malegaon

राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी काल (शुक्रवार) निवडणूक (Election) प्रक्रिया पार पडली होती. त्यापैकी काही बाजार समित्यांचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत (Malegaon Market Committee Elections) नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना होम पीचवर मोठा धक्का बसला आहे…

- Advertisement -

APMC Election 2023 : नाशिक बाजार समिती; सोसायटी महिला गटातून कल्पना चुंभळे, सविता तुंगार विजयी

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Dr.Advay Hiray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचा सोसायटी गटातून अकरा पैकी दहा जागांवर विजय झाला आहे. तर एका जागेवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलचे उमेदवार चंद्रकांत शेवाळे निवडून आले आहेत.

VIDEO : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे सोसायटी गटातील विजयी उमेदवार व मिळालेली मते

सोसायटी सर्वसाधारण गट

१) हिरे अद्वय प्रशांत – 963

२) चव्हाण विनोद गुलाबराव – 951

३) इंगळे उज्जैन निंबा- 870

४) पवार संदिप अशोक – 814

५) सुर्यवंशी सुभाष भिला – 809

६) मोरे रविंद्र गोरख – 802

७) पवार राजेंद्र तुकाराम – 801

सोसायटी – महिला राखीव गट

८) देवरे मिनाक्षी अनिल – 979

९) बोरसे भारती विनोद – 883

सोसायटी वि.जा/भ.ज

१०) शिरोळे नंदलाल दशरथ – 928

पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलचे विजयी उमेदवार

चंद्रकांत शेवाळे – 854

- Advertisment -

ताज्या बातम्या