Friday, April 26, 2024
Homeनाशिकसण-उत्सवांसाठी मलेगाव प्रशासन सज्ज; बैठकीत उपाययोजनांचा आढावा

सण-उत्सवांसाठी मलेगाव प्रशासन सज्ज; बैठकीत उपाययोजनांचा आढावा

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरात आगामी काळात साजर्‍या होणार्‍या क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती (Mahatma Phule Jayanti), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti), रमजान ईद (Ramadan Eid) व इतर सण-उत्सवांच्या (festivals) पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज आहे.

- Advertisement -

या काळात दैनंदिन स्वच्छता, पिण्याचे पाणी, पथदीप, जंतूनाशक औषधांची फवारणी, मिरवणूक (Procession) मार्गांची डागडुजी व अतिक्रमण (Encroachment) हटविण्याच्या कामांकडे विभागप्रमीखांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. त्यात कुठल्याही अडचणी किंवा समस्या आल्यास त्यांचे तातडीने वरिष्ठांकडून निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन

मनपा उपायुक्त राजू खैरनार (Municipal Corporation Deputy Commissioner Raju Khairnar) यांनी केले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी (Municipal Commissioner Bhalchandra Gosavi) यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा व पोलीस प्रशासन अधिकार्‍यांची संयुक्त आढावा बैठक (Review meeting) मनपा उपायुक्त खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी त्यांनी मनपाच्या स्वच्छता, पाणीपुरवठा (Water supply), विद्युत, बांधकाम, अतिक्रमण व इतर विभाग प्रमुखांनी केलेल्या नियोजनाचा प्रशासकीय आढावा घेतला. अतिक्रमण विभागाने (Department of Encroachment) शहरातील प्रमुख रस्ते व मिरवणूक मार्गावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ काढावीत. पाणीपुरवठा विभागाने मिरवणूक मार्गावरठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच सण-उत्सव काळात नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमुख मिरवणूक मार्गांची डागडुजी करावी व सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी.

स्वच्छता विभागाने शहरातील दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मलेरीया विभागाने सण-उत्सव काळात नियमीतपणे औषध फवारणी करावी. विद्युत विभागाने मिरवणूक मार्गावरील पथदीप सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी तसेच शहरातील प्रमुख महापुरूषांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करावी. उद्यान विभागाने एकात्मता चौकातील नियोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील गवत, झाडाझुडपांची साफसफाई करावी आदी सूचना उपायुक्त खैरनार यांनी केल्या.

आढावा बैठकीस पोलीस उपअधीक्षक लता दोंदे, प्रविणकुमार जाधव, पोलीस निरिक्षक सुरेश घुसर, संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक जगन्नाथ बोरसे, प्रकाश काळे, मनपाचे सहाय्यक आयुक्त सचिन महाले, सुनिल खडके, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, उपअभियंता एस.टी. चौरे, जयपाल त्रिभुवन, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, प्रभाग अभियंता महेश गांगुर्डे, मंगेश गंवादे, आस्थापना पर्यवेक्षक अनिल कोठावदे, अतिक्रमण अधीक्षक शाम कांबळे, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, वाहन विभाग प्रमुख नानाजी गांगुर्डे, वरिष्ठ लिपीक राहुल अहिरे, नवल खैरनार, नानाजी शिंदे, रमाकांत धामणे, लिपीक अमोल येवले, दिलीप मोरे, अजय पगारे, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पे अ‍ॅण्ड पार्कचे नियोजन

आढावा बैठकीत पोलीस विभागातर्फे काही सूचना करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्कींग सुविधा नसल्याने वाहनचालक आपली मोटारसायकल कुठेही उभी करतात. त्यामुळे मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत आहे. यास्तव मनपाने ठिकठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्क व्यवस्थेचे नियोजन करावे, असे पोलीस विभागाने सूचित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या