Saturday, May 11, 2024
Homeनगरमालदाड सोसायटी; साहेबराव नवले गटाची सरशी

मालदाड सोसायटी; साहेबराव नवले गटाची सरशी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील मालदाड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सन 2022- 2027 करिता संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत साहेबराव रामचंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमशक्ती ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत 13-0 ने विरोधी कानिफनाथ शेतकरी विकास पॅनलला पराभवाची धूळ चारली. मालदाड सोसायटीच्या सर्व सुज्ञ सभासदांनी व स्वाभिमानी मालदाडकरांनी साहेबराव रामचंद्र नवले यांच्या स्वच्छ, पारदर्शक व उल्लेखनीय सेवांच्या बळावर प्रचंड विश्वास ठेवत एकतर्फी मतदान करून प्रचंड बहूमताने संपूर्ण पॅनलला विजयी केले.

- Advertisement -

श्रमशक्ती ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ- बाबासाहेब कारभारी नवले (354), दिलीप गजानन नवले (353), परशराम सखाहरी नवले (346), रावसाहेब भीमराज नवले (343), लिंबा विठ्ठल नवले (336), बबन रामभाऊ नवले (333), लक्ष्मण सुखदेव नवले (333), संजय लहानु गुरुकुले (331). महिला प्रतिनिधी मतदार संघ – द्रौपदाबाई माधव नवले (360), रंजना नवनाथ नवले (348), अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ – किसन नंदू भालेराव (326) इतर मागासवर्गीय मतदार संघ- प्रशांत सिताराम नवले (356), भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग मतदार संघ -भिमा लक्ष्मण गोफणे (354).

श्रमशक्ती ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड बहूमताने विजयी घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. मतदार बंधू भगिनींचे जाहीर आभार व्यक्त करताना महिला व ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

गावपातळीवरील राजकारणात लक्ष घालणार्‍या तालुका पातळीवरील पुढार्‍यांना मतदारांनी हिसका दाखवत चांगलीच चपराक दिल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित संचालकांनी व्यक्त केली.

श्रमशक्ती ग्रामविकास पॅनलचे मार्गदर्शक साहेबराव नवले म्हणाले, आपली सोसायटी ही केवळ जिल्ह्यात नव्हे तर राज्यासाठी पथदर्शक स्वरूपाची सोसायटी व्हावी, यासाठी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाने काम करावे, अशी आशा व्यक्त करत नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन व सभासद आणि स्वाभिमानी मालदाडकर यांनी मागील संचालक मंडळाने केलेल्या कार्याला विश्वास देत प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल विशेष आभार मानले.

सोसायटीच्या निवडणुका होत असताना तालुक्यातील सत्तारुढ पार्टीने सोसायटी मतदारांना कपबशीचा बॉक्स व चांदीचे नाणे असे गीफ्ट घरोघरी पोहचविल्याची चर्चा तालुकाभर चालू आहे. तसाच प्रयोग मालदाडमध्ये देखील मतदानाच्या आदल्या दिवशी झाल्याची चर्चा मतदारांमध्ये होती. मात्र मालदाड सोसायटीच्या मतदारांनी सोसायटीच्या चांगल्या कामाला व सभासदांच्या हितासाठी श्रमशक्ती पॅनलवर विश्वास टाकत बहुमताने सत्ता दिली. मतदारांनीच निवडणूक हातात घेऊन श्रमशक्तीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी केल्याने विरोधकांच्या अमिषाला मतदारांनी कुठलाही थारा दिला नसल्याचे या निवडणुकीतून दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या