मलाबार गोल्ड अँड डायमंड्स उघडणार २२ नवीन शोरूम

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नवीन वर्ष २०२२ मध्ये जागतिक विस्ताराच्या योजनांचा एक भाग म्हणून मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून ( Malabar Gold & Diamonds) चालू महिन्यात (जाने. २०२२) भारत आणि परदेशात मिळून २२ नवीन शोरूम्स उघडली जाणार आहे….

भारतात पहिल्यांदाच आभूषण किरकोळ विक्रेता शृंखला एवढ्या मोठ्या संख्येने शोरूम्स एकत्र उघडत आहे. एकूण शोरूमची संख्या २०२३ च्या अखेरीस ७५० पर्यंत वाढविणे आणि जगातील प्रथम क्रमांकाचे सोन्याच्या आभूषणांचे विक्रेता बनण्याचे मलाबारचे लक्ष्य आहे.

नियोजित विस्तार कार्यक्रमामुळे दागिन्यांच्या व्यापाराशी संबंधित किरकोळ विक्री, उत्पादन, तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात आणखी ५,००० रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद (M P Ahamad President, Malabar Gold & Diamonds) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नव्याने उघडल्या जाणाऱ्या २२ शोरूमपैकी १० भारतात असतील आणि उर्वरित जिथे मलाबारचे आधीच अस्तित्व आहे अशा इतर देशांमध्ये सुरू होतील. या वर्षी विस्ताराच्या या नवीन टप्प्यासाठी समूह आणखी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक (800 crore rupees investment) करणार आहे.

जगातील सर्वात मोठा ज्वेलरी समूह बनण्याच्या उद्देशाने, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स जागतिक स्तरावर जलद विस्तार प्रकल्प राबवत आहे. विस्तार मोहिमेची सुरुवात ८ जानेवारीला बेंगळुरूमधील एमजी रोड येथे कलात्मक शोरूमच्या शुभारंभाने होईल. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातील इतर शोरूम उघडण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील विस्तार योजना कंपनीचे या आघाडीवरील ध्रुव स्थान आणखी मजबूत करेल असा विश्वास मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या भारतातील कार्यसंचालनाचे व्यवस्थापकीय संचालक ओ. आशर (O Ashar) तसेच कंपनीचे आंतरराष्ट्रीय कार्यसंचालनाचे व्यवस्थापकीय संचालक, शामलाल अहमद (MD Shamlal Ahmad) यांनी व्यक्त केला.

आम्हाला खात्री आहे की आमचे ग्राहक आमच्या सर्व नवीन शोरूममध्ये जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव घेतील आणि पारदर्शकता, विश्वास, गुणवत्ता आणि सेवेवर आधारित आमच्या मूल्यांची प्रशंसा करतील. भारताला जगाची उन्नत बाजारपेठ बनविण्याचे आमचे ध्येय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय दागिन्यांची ब्रँड व्हॅल्यू अधिक अधोरेखित करणे आणि उत्पादन क्षेत्रात देशांतर्गत रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे ही आमची वचनबद्धता आहे.

एम. पी. अहमद (अध्यक्ष, मलाबार समूह)

आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतातील लहान शहरांमध्ये इष्टतम आकाराच्या दालनांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला खात्री आहे की या द्विसूत्री धोरणाचे सकारात्मक परिणाम होतील.

अब्दुल सलाम के.पी.(उपाध्यक्ष)

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे १० देशांमध्ये विक्री दालनांचे अस्तित्व आहे. याशिवाय, समूहाचे १४ घाऊक युनिट्स आणि नऊ दागिने घडविण्याचे युनिट्स भारतात आणि परदेशात आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल ४.५१ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स कंपनीच्या नफ्यांपैकी ५ टक्के निधी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, गरिबांसाठी घरे आणि पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित करणार्‍या विविध सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांसाठी राखून ठेवला जातो. केरळमध्ये कंपनीने परित्यक्ता माता आणि वृद्ध निराधार महिलांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सरकारने त्यासाठी जमीन दिल्यास मातांसाठी पुनर्वसन घरे बांधण्याची इच्छा कंपनीने आधीच व्यक्त केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *