Wednesday, April 24, 2024
Homeनगरग्रामपंचायत निवडणूक : माक्यात 5 प्रभागांतून 13 तर कांगोणीत 4 प्रभागांतून 11...

ग्रामपंचायत निवडणूक : माक्यात 5 प्रभागांतून 13 तर कांगोणीत 4 प्रभागांतून 11 सदस्य

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 18 डिसेंबर रोजी निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींपैकी तिसरी मोठी ग्रामपंचायत असलेल्या माका ग्रामपंचायतीसाठी 5 प्रभागातून 13 सदस्य तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील सरपंच पदाच्या उमेदवाराला निवडून द्यावे लागणार आहे.

- Advertisement -

माक्याची लोकसंख्या 4808 इतकी असून त्यातील 426 अनुसूचित जाती तर 51 अनुसूचित जमातीचे आहेत. प्रभाग क्र. 1, 2 व 5 मधून प्रत्येकी तीन तर प्रभाग 3 व 4 मधून प्रत्येकी दोन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत.

प्रभाग क्र. 1 – या प्रभागाची लोकसंख्या 1108 इतकी असून त्यात अनुसूचित जातीचे 43 व अनुसूचित जमातीचे अवघे तीन लोक आहेत. या प्रभागातून एक सर्वसाधारण स्त्री, एक नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री व एक सर्वसाधारण असे तीन उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत. पुर्वेकडून माका ते शिंगवे रस्ता, दक्षिणेकडून आडगाव शिव, पश्चिमेकडून महालक्ष्मीहिवरे शिव तर उत्तरेकडून माका महालक्ष्मी हिवरे रस्ता व नगर-शेवगाव रोड, अशी या प्रभागाची हद्द आहे.

प्रभाग क्र. 2 – या प्रभागाची लोकसंख्या 1091 इतकी असून त्यातील अनुसूचित जातीचे 266 लोक आहेत तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या शून्य आहे. या प्रभागातून अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे तीन उमेदवार निवडून जाणार आहेत. पुर्वेकडून माका-पाचुंदा व माका-देडगाव रस्ता, दक्षिणेकडून माका ते महालक्ष्मीहिवरे रस्ता व नगर-शेवगाव रोड, पश्चिमेकडून महालक्ष्मी हिवरे शिव तर उत्तरेकडून ओढा अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभाग क्र. 3 – या प्रभागाची लोकसंख्या 759 असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य तर अनुसूचित जमातीची 48 इतकी आहे. एक सर्वसाधारण महिला व एक सर्वसाधारण असे दोनजण या प्रभागातून निवडून जातील. पुर्वेकडून माका ते देडगाव रस्ता, दक्षिणेकडून ओढा, पश्चिमेकडून महालक्ष्मीहिवरे शिव तर उत्तरेकडून देडगाव शिव असा हा प्रभाग आहे.

प्रभाग क्र. 4 – या प्रभागाची लोकसंख्या 762 असून यातील 16 जण अनुसूचित जातीचे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या शून्य आहे. सर्वसाधारण स्त्री व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असे दोन उमेदवार या प्रभागातील मतदारांना निवडून द्यावयाचे आहेत. पुर्वेकडून माका ते पाचुंदा रस्ता, दक्षिणेकडून देडगाव रस्ता व हरिजन, मातंग वस्ती, पश्चिमेकडून माका-देडगाव रस्ता तर उत्तरेकडून पाचुंदा शिव अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभाग क्र. 5 – या प्रभागाची लोकसंख्या 1088 असून यातील 101 अनुसूचित जाती लोकसंख्या असून अनुसूचित जमातीची शून्य आहे. एक सर्वसाधारण महिला, एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व एक सर्वसाधारण असे तीन सदस्य या प्रभागातील मतदार निवडून देतील. पुर्वेकडून पाचुंदा-निंबेनांदूर शिव, दक्षिणेकडून वाघुली शिव, पश्चिमेकडून माका-पाचुंदा रस्ता व माका शिंगवे रस्ता तर उत्तरेकडून पाचुंदा शिव असा हा प्रभाग आहे.

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील कांगोणी ग्रामपंचायतीच्या 18 डिसेंबरला होत असलेल्या निवडणुकीत 4 प्रभागातून 11 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्याशिवाय सर्वसाधारणसाठी महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदाच्या एका उमेदवाराला मतदान करावे लागणार आहे.

या गावची एकूण लोकसंख्या 3448 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 582 तर अनुसूचित जमाती लोकसंख्या 65 इतकी आहे. प्रभाग क्रमांक 1, 2 व 4 मधून प्रत्येकी तीन सदस्य तर प्रभाग 3 मधून दोन सदस्य असे एकूण 11 सदस्य निवडून दिले जाणार आहेत.

प्रभाग 1- या प्रभागाची लोकसंख्या 945 इतकी असून या प्रभागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या शून्य आहे. अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे तीन उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत. पुर्वेकडून कांगोणी ते घोडेगाव जुना रस्ता, दक्षिणेकडून घोडेगाव शिव, पश्चिमेकडून हिंगोणी शिवण शिंगणापूर शिव तर उत्तरेकडून मारुती मंदीर ते महादेव मंदीर अंतर्गत रोड असा हा प्रभाग आहे.

प्रभाग क्र. 2 – या प्रभागाची लोकसंख्या 941 असून त्यात 85 अनुसूचित जाती व 64 अनुसूचित जमातीचे आहेत. या प्रभागातून एक सर्वसाधारण, एक सर्वसाधारण स्त्री व एक नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती असे तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. पुर्वेकडून विठ्ठल मंदीर ते सरळ खरवंडी शिव, दक्षिणेकडून विठ्ठल मंदीर ते महादेव मंदीर अंतर्गत रोड, पश्चिमेकडून हिंगोणी शिव तर उतरेकडून खरवंडी शिव अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभाग क्र. 3 – या प्रभागाची लोकसंख्या 624 असून त्यातील 497 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 01 अशी लोकसंख्या आहे. या प्रभागातून सर्वसाधारण स्त्री व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असे दोन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. पुर्वेकडून बर्‍हाणपूर शिव, दक्षिणेकडून गणपती मंदीर ते सरळ बर्‍हाणपूर शिव, पश्चिमेकडून विठ्ठलमंदीर कडून आलेला अंतर्गत रस्ता ते सरळ खरवंडी शिव तर उत्तरेकडून खरवंडी शिव अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभाग क्र. 4 – या प्रभागाची लोकसंख्या 938 असून या प्रभागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या शून्य आहे. या प्रभागातून अनुसूचित जाती, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे तीन उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत. पुर्वेकडून बर्‍हाणपूर शिव, दक्षिणेकडून घोडेगाव शिव, पश्चिमेकडून गणपती मंदीर अंतर्गत रस्ता ते कांगोणी-घोडेगाव जुना रस्ता तर उत्तरेकडून गणपती मंदीर ते सरळ बर्‍हाणपूर शिव अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या