Friday, April 26, 2024
Homeनाशिकमाझे कुटूंब माझी जबाबदारी विशेष मोहीम राबविणार

माझे कुटूंब माझी जबाबदारी विशेष मोहीम राबविणार

इगतपुरी । Igatpuri

माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये सुरु केलेली असुन इगतपुरी तालुक्यात विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहीती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

इगतपुरी तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे व गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहीमेची रुपरेखा आखण्यात आली.

तालुक्यात (दि. १८) पावेतो कोरोना बाधित रुग्ण संख्या १०७५ इतके संशयित व्यक्ति झाले असुन या पार्शभुमीवर संपूर्ण तालुक्यात व शहरात मोहीम कालावधीत प्रत्येक व्यक्तिस आरोग्य शिक्षण व कोविड प्रतिबंधाचे संदेशही देण्यात येतील. तालुक्यात प्रत्येक गावाकरिता ३ कर्मचारी ( यात १ आरोग्य कर्मचारी २ करोनादुत ) काम करणार असुन प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी करणार आहे.

यात संशयित कोवीड रुग्ण शोधणे तसेच मधुमेंह, हदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा, बालकांचे लसीकरण व गरोधर मातांवर उपचार या योजनेत असल्याचे तहसीलदार कासुळे यांनी सांगितले.

तालुक्यात ग्रामिण क्षेत्र घर संख्या ४८४१६ व शहरी घर संख्या ७८५४ इतकी आहे.प्रत्येकी ५० घरांसाठी एक पथक असुन या पथकास शासनामार्फत वैघकीय साहित्यांची किट उपलब्ध करुन दिलेली आहे. करोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सकस आहार, व्यायाम व आरोग्याची काळजी घेतल्यास या विषाणुपासुन बचाव करता येणे सहज शक्य असल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख यांनी दिली. सर्व नागरिकांनी सर्वोतोपरी काळजी घेऊन या माहिमेस प्रतिसाद देऊन आपली तपासणी करावी असे आवाहन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या