Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसंततधार पावसामुळे मक्याचे नुकसान; पिकावर फिरवला रोटर

संततधार पावसामुळे मक्याचे नुकसान; पिकावर फिरवला रोटर

नाशिक । Nashik

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे (rain) मका (Maize) पिक (crop) पूर्णपणे खराब झाल्याने व उत्पादन खर्च निघत नसल्याने येवला तालुक्यातील (Yeola taluka) ठाणगाव (Thangaon) येथील तरुण शेतकरी (farmer) प्रवीण शेळके (Praveen Shelke) यांनी आपल्या मक्याच्या उभ्या पिकावर रोटर फिरवत काढून टाकल्याची घटना घडली…

- Advertisement -

तसेच या तरुण शेतकऱ्यांने दोन महिन्यापूर्वी मक्याची पेरणी (sowing) केली होती, मात्र त्यानंतर संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मका पिक पूर्णपणे खराब झाल्याने या पिकाचा जनावरांकरिता चारा देखील होत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांने संतप्त होत उभ्या दोन एकर मका पिकावर रोटर फिरवत पिक काढून टाकले. या शेतकऱ्याला मका पिकाकरिता जवळपास ३० ते ३५ हजार रुपयांच्या आसपास खर्च (Costs) आला होता.

दरम्यान, मका पिक खराब झाल्याने उत्पादन खर्च (Production Costs) निघणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे पिकावर रोटर फिरवून काढून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. तसेच या शेतकऱ्याला सरकारने (Government) शासन स्तरावरून मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या