Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedदिल्ली मेट्रोच्या देखरेखीचे काम औरंगाबादमधील कंपनीला 

दिल्ली मेट्रोच्या देखरेखीचे काम औरंगाबादमधील कंपनीला 

औरंगाबाद – Aurangabad

औद्योगिक औरंगाबादची देशासह जगभर ओळख आहे. त्यात ऑटोमोबाइल, लिकर, फार्मास्युटिकल्स, कृषिपूरक, आयटी उद्योगांचा समावेश आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे विणले जात आहे. दिल्ली मेट्रोच्या उभारणीत महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम औरंगाबादच्या ‘एक्सलाइझ सॉफ्टवेअर’ला मिळाले आहे. विशेष म्हणजे या कंपनीला ‘नागपूर मेट्रो’चेही काम मिळाले होते. देशात एकाच कंपनीला दोन मेट्रोचे काम मिळण्याची ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

‘दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन’च्या (डीएमआरसी) कामात इंटिग्रेटेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयपीएमएस) अंतर्गत देखरेखीचे काम केले जाते. त्यामध्ये थ्री-डी पद्धतीत इमारत वा पायाभूत सुविधांच्या मॉडेल उभे केले जाते. त्यात सुरु असलेले काम कसे प्रगतीपथावर सुरू आहे, काम वेळेवर होतेय की नाही, बजेटमध्ये काम होतेय की नाही याची पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. एक्सलाइझ सॉफ्टवेअरने यापूर्वी ‘नागपूर मेट्रो’चे काम केले आहे. त्यात या कंपनीसह अन्य दोन कंपन्यांचा समावेश होता. 

औरंगाबादेतील एक्सलाइज इंजिनीअरिंग सर्व्हिसेस, दिल्लीतील मॅन्सीकॉम कन्स्लटंटकडे व्यवस्थापन आणि आयपीएम्सची जबाबदारी असेल. चेन्नई येथील नाधी इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड हे टेक्नॉलॉजी पार्टनर आहेत. एक्सलाइझ बिल्डिंग इन्फोर्मेशन मॅनेजमेंट (बीआयएम) कंपनी आहे. प्रताप आणि सोनाली धोपटे यांनी या कंपनीची सुरुवात २००४ मध्ये झाली. सध्या या ठिकाणी ८० जण कार्यरत आहेत. भारतासह, कतार, अमेरिका, इंग्लंडमध्ये कंपनीचे काम सुरू आहे. विमानतळे, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक इमारती, औद्योगिक इमारती, कन्व्हेन्शन सेंटर्सची कामे एक्सलाइजने केली आहेत. दिल्ली मेट्रोच्या कामाच्या रूपाने औरंगाबादचा झेंडा आता दिल्लीत फडकणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या