Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामातीची सुपीकता टिकवणे शेतकर्‍यांच्या हातात

मातीची सुपीकता टिकवणे शेतकर्‍यांच्या हातात

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

मातीची सुपीकता ( soil fertility)टिकवणे शेतकर्‍यांचे हातात आहे. आम्ही प्रामुख्याने भात पिकवतो. दीर्घ अनुभव व अभ्यास केला तर उत्कृष्ट शेती करता येते. मी शेतात काळा भात देखील यशस्वीरित्या पिकवला होता. जे शेतीतून मिळते तेच तण पुन्हा शेतीला दिल्यास त्यांचे खत तयार होते त्यातून मातीची सुपीकता टिकून राहते. माझी शेती नापीक नाही असा विश्वास शेतकर्‍याला हवा. तो येण्यासाठी माती परीक्षण करावे.

- Advertisement -

रत्नाकर घोटेकर

जीवामृतवर भर द्यावा

शेतकर्‍यांनी तणनाशक वापरू नये. त्यामुळे जमीन नापीक होण्याचा धोका वाढू शकतो. देशी गायीचे शेण व गोमुत्र वापरून जीवामृत तयार करा. त्याचा वापर करा. त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. रासायनिक खतांचा वापर टाळावा. शेती नापीक झाली तर लोक उपाशी राहातील. माती परीक्षण करून योग्य ते घटक वापरून माती सुपीक करता येते.

आशुतोष महाजन

माती परीक्षणासाठी कृषी खात्याने सहकार्य करावे

प्रत्येक शेतकर्‍याकडे गाय आणि म्हैस असल्यास त्यांच्या शेणीपासून तयार झालेले शेणखत वापरावे. रासायानिक खत वापर टाळावा.जनावरे घेण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना सहकार्य करावे. सध्या वृक्षारोपणाचे दिवस आहेत. पण माती परीक्षण करूनच वृक्षारोपण करावे. वन विभागाने याबाबत दक्षता घ्यावी.

नाना भोई

शेतीचा अभ्यास व्हायला हवा

शेती करणे फायद्याचे राहिलेले नाही हे खरे. पण तसे का झाले? शेतजमीन निकृष्ट का होत चालली आहे? याचा अभ्यास सर्वांनीच करायला हवा. अनेक शेतकरी शेती फायद्याची असल्याचे सांगतात. तशी ती करुनही दाखवतात. कारण ते शेतीचा अभ्यास करतात. तसा तो प्रत्येकाने करायला हवा. रासायनिक खतांचा वापर टाळायला हवा. जमिनीला विश्रांती द्यायला हवी. आज नेमके तेच घडत नाही. सलग पिके घेतली जातात. किंवा वर्षानुवर्ष एकाच पद्धतीचे पीक घेतले जाते. अनेकदा शेतकर्‍यांचाही नाईलाज असतो हे खरे.पण कालांतराने जमीनच निपजाऊ होण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. त्यामुळे हीच वेळ आहे सर्वांमध्येच जागरुकता निर्माण होण्याची. आपल्या पुढच्या पिढ्यांना सजगतेचा वारसा आपण सोपवायला हवा. त्यांच्यासाठी मातीचा कस जपायला हवा.

रोहित सकाळे

- Advertisment -

ताज्या बातम्या