Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यालोकल ऐवजी ‘मेमू’ सुरू करणार; मेमू म्हणजे नेमकं काय?

लोकल ऐवजी ‘मेमू’ सुरू करणार; मेमू म्हणजे नेमकं काय?

नाशिकरोड । प्रतिनिधी

इगतपुरी-कसारा घाटातील तांत्रिक अडचणीमुळे लोकल रेल्वेगाडीची चाचणी घेण्यास सध्या परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे नाशिक-कल्याण दरम्यान लोकल ऐवजी ‘मेमू’ रेल्वे चालविण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे.

- Advertisement -

देवळाली-भुसावळ दरम्यान तीन महिन्यात मेमू ट्रेन चालवण्यात येईल, अशी माहिती रेल्वेचे भुसावळ विभागाचे डीआरएम विवेकुमार गुप्ता यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत गुप्ता म्हणाले की, भुसावळ विभागात 20 आयसोलेशन कोच तयार असून अत्यंत कमी खर्चात ते तयार केले आहेत. स्थानिक प्रशासनाने मागणी करताच ते करोना रुग्णांसाठी देण्यात येतील. प्रवाशांच्या सुरक्षेसासाठी मुंबईहून रेल्वेगाडीचे सॅनिटायझेशन केले जात आहे.

महत्वाच्या स्टेशनवरही सॅनिटायझेशन केले जाते. नाशिक-पुणे या 235 किमी रेल्वेमार्गाला 16 हजार कोटी खर्च अपेक्षित असून 1400 एकर जमीन संपादित करायची आहे. त्याची तयारी सुरु आहे. पीपीपी तत्वावर हे काम केले जात आहे.

खेरवाडीबरोबरच भुसावळ व नांदगावलाही लवकरच रेल टर्मिनल कंटेनर सुरु होणार आहे. कसबे सुकुणेत गुड शेड सुरु झाली आहे. यामुळे शेतीमालाची कमी वेळेत व खर्चात वाहतूक होऊन शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे.

लॉकडाऊनमुळे स्पेशल ट्रेन वगळता अन्य बंद असल्याने भुसावळ विभागाला दिवसाला दोन कोटींचा तोटा होत आहे. त्यातच प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत करावे लागले. आतापर्यंत दोनशे कोटींचा तोटा झाला आहे.

तथापी, मालगाडी व पार्सल ट्रेनमुळे हा तोटा काही प्रमाणात भरुन निघण्यास मदत मिळत आहे.

लॉकडाऊनमध्ये 80 श्रमिक ट्रेन चालविल्याने 200 कोटीचा महसूल मिळाला. तर गेल्या चार महिन्यात रेल्वेवाहूतक बंद असल्याने इंधनाचे 70 कोटी वाचले. नाशिक शहरातील तिकीट आरक्षण कार्यालयाव्दारे चांगला महसूल मिळतो. हे कार्यालय बंद करण्याचा विचार नाही. महापालिकेने भाडे व घरपट्टीत सवलत द्यावी यासाठी बोलणी सुरु आहेत. किसान ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने ती आठवड्यातून दोनदा करण्यात आली आहे.

तसेच कोल्हापूर-दौंड मनमाड किसान पार्सल लिंक गाडीही सुरु करण्यात आली आहे. मेलच्या वेगाने किसान ट्रेन धावते. 7 आगस्टला देशातील पहिली किसान ट्रेन देवळालीहून सुरु झाली. आतापर्यंत 342 टन शेती मालवाहतूक करण्यात आली.

बांगलादेशला रेल्वने प्रथमच कांदा निर्यात झाली. 55 मालगाड्या कांदा गेला. देशात मोटर व्हेईकलचे चार रेक पाठवले आहेत. हार्टिकल्चर स्पेशल ट्रेनचा विचार सध्या नाही. राज्यात एसटी बस सेवा सुरु झाली आहे. केंद्र व राज्य सरकारचे निर्देश मिळताच प्रवासी रेल्वे सुरु करण्यात येईल. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

फ्रेट रेव्हन्यूसाठी बिझनेस डेव्हलपमेन्ट युनियन कार्यरत आहे. नवीन ट्रॅफिकसाठी गुडस ट्रेन 23 किमीऐवजी 43 किमी इतक्या वेगाने पळत आहे. मालगाडी वाहतूकीत 135 टक्के वाढ झाली आहे. कांदा व इंधन वाहतूकीने त्यात चांगली भर पडली असल्याचे गुप्ता यांनी ऑनलाईन चर्चेत सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या