Friday, April 26, 2024
Homeनगरमुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी सोमवारी (दि. 27) सकाळी विळद गावात फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. महापालिकेकडून दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यात व्यत्यय येत असल्याने दुरुस्तीला विलंब होत आहे. परिणामी, नगर शहर व उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

- Advertisement -

दुरुस्तीमुळे पाणीउपसा बंद असल्याने शहराच्या उपनगरात पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. तसेच वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी व सावेडीतील गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको, तसेच सारसनगर, बुरुडगाव रोड, मुकुंदनगर आदी परिसरास पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात मंगळवारी (दि. 28) पाणी सोडण्यात येणार आहे.

तसेच रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, नालेगाव, माळीवाडा (काही भाग), चितळे रोड, कापडबाजार, तोफखाना व सावेडी, बालिकाश्रम रोड परिसर, कल्याण रोड परिसर, स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा या परिसरात बुधवारी (दि.29) पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या