Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहिंद्र युनियन निवडणूक ८ जागांसाठी अर्ज दाखल; माघारीनंतर स्पष्ट होणार चित्र

महिंद्र युनियन निवडणूक ८ जागांसाठी अर्ज दाखल; माघारीनंतर स्पष्ट होणार चित्र

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

नाशिक औद्योगिक वसाहतीतील उद्योग क्षेत्राची अर्थवाहीनी असलेल्या महिंद्र कंपनीतील कामगारांची अंतर्गत कामगार संघटना महिंद्र एम्प्लॉईज युनियनची त्रैवार्षिक निवडणूक प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे जाहीर करण्यात आली असून, या निवडणूकीसाठी ८ जागांसाठी ८० अर्जांची विक्री झाले होेते. काल (दि. ५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीत ८ जागांसाठी ७४ अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

कामगार संघटनेच्या या निवडणूकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणिस, सहचिटणिस, चिटणिस, खजिनदार, कमिटी सदस्य-अ व कमिटी सदस्य-ब अश्या एकूण ८ सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेतलेे जाणार आहे. त्यासाठी कंपनीतील २ हजार २०० कामगार सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणार आहेत.

या निवडणूकीत अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी साठी एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर सरचिटणिस पदासाठी ७ उमेदवार नशिब आजमावत आहेत. उपाध्यक्ष एक जागा (८ अर्ज), सहचिटणिस एक जागा (१५ अर्ज), चिटणिस एक जागा (१० अर्ज), खजिनदार एक जागा (७ अर्ज) तर कमिटी सदस्य-अ एक जागा (१५ अर्ज) व कमिटी सदस्यं-ब एक जागा (७ अर्ज) दाखल झालेले आहेत.

विद्यमान सरचिटणिस सोपान शहाणे यांची निवृत्ती झाल्याने ते रिंगणातून बाहेर आहेत. तर विद्यमान अध्यक्षांसह विद्यमान कमिटीचे ६ पदाधिकारी रिंगणात आहेत.

जाहीर निवडणूक कार्यक्रम

आज (दि. ६) उमेदवार अर्जाची छाननी अंतिम मुदत असून,त्यानंतर अंतिम यादी सोमवारी (दि. ८) जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (दि. ९) सायं. ०५ वाजेपर्यंत आहे.

त्यनंतरच निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान दि. १३ फेब्रुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान घेतले जाणार असून त्यानंतर लगेचच मतमोजणी केली जाणार आहे. मतोजणी संपल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या