Friday, April 26, 2024
Homeनगरमराठा उद्योजक लॉबीच्या शहराध्यक्षपदी महेश आठरे

मराठा उद्योजक लॉबीच्या शहराध्यक्षपदी महेश आठरे

अहमदनगर (प्रतिनिधी) –

मराठा उद्योजक लॉबीच्या नगर शहराध्यक्षपदी युवा मराठा उद्योजक महेश आठरे यांची निवड झाली आहे.

- Advertisement -

मराठा उद्योजकांच्या संघटनातून व्यवसायात येणार्‍या समस्या सोडविण्याचा तसेच तरूणांनी व्यवसायाकडे वळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महेश आठरे यांनी निवडीनंतर बोलताना सांगीतले. निवडीबद्दल आठरे यांचा केमिस्ट परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.

केमिस्ट व्यावसायिक असलेले महेश आठरे यांच्या या निवडीचा केमिस्ट असोसिएशनला अभिमान असून या माध्यमातुन तरुणांमध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याचा मानस केमिस्ट सुधीर लांडगे यांनी व्यक्त केला.यावेळी राजेंद्र बेंद्रे, मिलींद क्षीरसागर, सुधाकर बोरुडे, राहुल गोरे, सचिन मोटे, अविनाश साळुंके, प्रताप धुमाळ, महेंद्र राऊत उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या