Friday, April 26, 2024
Homeनगरभर पावसात महावितरणे केला उंबरेचा वीजपुरवठा सुरळीत

भर पावसात महावितरणे केला उंबरेचा वीजपुरवठा सुरळीत

उंबरे |वार्ताहर| Umbare

उंबरे येथे भर पावसामध्ये विजेची तार विद्यूत पुरवठा सुरू असताना तुटली. त्यामुळे सगळीकडे आगीचे लोळाच्या ठिणग्या उडत असल्याने महावितरणने तात्काळ विज पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -

काल सोमवार दि 26 रोजी सायंकाळी चार वाजता झिमझिम पाऊस सुरू होता. अशा परिस्थितीत अचानक विजेच्या खांबावरुन विजेचे लोळ मोठया प्रमाणात पडू लागल्याने अनेकांची धावपळ सुरू झाली. अशा परिस्थितीमध्ये महावितरणाचे कर्मचारी एम एम सय्यद यांना फोनवरून कल्पना दिली. त्यांनी तातडीने त्यांचे कर्मचारी व ते घटनास्थळी हजर झाले. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते भैय्या शेळके यांनी ताबडतोब ट्रांसफार्मरचा वीज पुरवठा खंडित केला.

त्यानंतर एका तासातच महावितणचे अभियंता धिरज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणाचे कर्मचारी एम. एम. सय्यद, दीपक ढोकणे, सामाजिक कार्यकर्ते भैय्या हापसे, पप्पु ढोकणे या सर्व टीमने पुन्हा भर पावसामध्ये खांबावर चढून वीज पुरवठा सुरळीत करून सर्व ग्रामस्थांना वीज सुरळीत करून दिली. त्यामुळे त्यांचे या परिसरातून कौतुक होत आहे. प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून काम करत असताना या महावितरणाच्या कर्मचार्‍यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून भर पावसात विजेची तार पुन्हा एकमेकाला जोडून वीज पुरवठा सुरळीत केल्यामुळे महावितरणाच्या कर्मचार्‍यांना धन्यवाद दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या