महावीर’च्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून लॅपटॉप भेट

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक l Nashik

कोविड-१९चा प्रादुर्भाव नाशिकमध्ये तसेच राज्यात अजूनही सुरु असून सर्व शिक्षणक्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे, अश्यावेळी ऑनलाईन शिक्षणात घरी बसून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे.

ऑनलाईन अभियांत्रिकी शिक्षणासाठी मोबाईल ऐवजी लॅपटॉप हे साधन अधिक चांगले आहे आणि याचा विचार करून श्री महावीर एज्युकेशन सोसायटीव्दारे संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप वितरण’ करण्यात आले. संस्थेच्या ऑडिटोरियम मध्ये सदर लॅपटॉप वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्यकारी विश्वस्थ राहुल संघवी होते ते यावेळी बोलतांना म्हणाले की, “महावीर एज्युकेशन सोसायटी एक धर्मदाय संस्था असून नफा मिळवणाऱ्या इतर संस्थापेक्षा वेगळी आहे, समाजाला केवळ देत राहणारी ही संस्था असून संस्था आज २२ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

संस्था ठरविलेल्या उद्दिष्टे आणि ध्येयाकडे गतीने मार्गक्रमन करत आहे आणि या २२ वर्षात विद्यार्थी आणि पालकांच्या पसंतीक्रमात संस्था अव्वल राहिली आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.” असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या समन्वयक तसेच आधिष्ठाता डॉ. प्रियंका झवर,संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य नवनाथ पाळदे, महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य संभाजी सगरे, वरिष्ठ प्राध्यापक संजय भामरे, विभागप्रमुख पुष्पेंदू बिश्वास, पराग देसले, रवींद्र जगताप, राहुल बनकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल संघवी अधिक बोलतांना म्हणाले की, “संस्थेचे आजवर ना-नफा-ना-तोटा तत्वावर आपले कार्य चालू ठेवले असून अनेक प्रकारचे समाजाभिमुख कार्य केले आहे, समाजाकडून मिळाले ते समाजात पुन्हा वाटण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही आणि त्यामुळे ‘महावीर’ शैक्षणिक ब्रॅण्ड हा सर्वच काळात टिकून राहिला आणि यशस्वी झाला आहे” असेही ते म्हणाले.

प्रा. संजय भामरे आणि प्रा. अपेक्षा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्राचार्य संभाजी सगरे यांनी आलेल्या विद्यार्थी पालक आणि पाहुण्यांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिव्या शिंदे, मनीषा पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कष्ट घेतले.

Share This Article