महावीर जयंती सलग दुसर्‍या वर्षी साध्या पद्धतीने साजरी

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

करोनाचा वाढता पादुर्भाव व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी भगवान महावीर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व भगवान महावीरांची शोभा यात्रा रद्द करण्यात येऊन केवळ विश्‍वस्त मंडळाच्या उपस्थित महावीर जयंती साजरी करण्यात आली.

पार्श्‍वनाथ दिगंबर जैन मंदिरात भागवंताची पूजा, अभिषेक पंडितजी पवन जोगी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्ष संजय कासलीवाल, महावीर भगवंताचे पूजन समाजाचे माजी अध्यक्ष अनिल पांडे, उपाध्यक्ष सुहास चुडीवाल, सचिव जितेंद्र कासलिवाल, विश्‍वस्त गुलाब झाजरी, अमित गोधा यांनी सर्व विधी पार पाडले. पोलीस निरीक्षक संजय सानप, राज मेहेर यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला हार घालून व पाळणा हलवून जैन विश्‍वासत मंडळाने शासनाचे नियम पाळाल्याबद्दल आभार मानले. सर्व कार्यक्रमाचे झूम मिटिंगव्दारे मिथून पांडे यांनी लाईव्ह दाखवले तर सुलोचना काला यांनी भंगवंताचा पाळणा म्हटला. मेन रोडवरील मूर्ती पूजक मंदिरत धार्मिक कार्यक्रम विश्‍वस्त शैलेश बाबरीया, शिवाजी रोडवरील जैन स्थानकात कुठल्याही धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला नाही. असे अध्यक्ष रमेश लोंढा यांनी सांगितले.

भगवान महावीर जयंतीनिमित्त पार्शवनाथ दिगंबर जैन मंदिरस विद्युूत रोषणाई करण्यात आली. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सकल जैन समाजाने महावीर जयंती साजरी केली. सायंकाळी मंदिराचे पुजारी यांच्या हस्ते महावीर भगवानची आरती करण्यात आली. भगवान महावीर जयंतीनिमित्त सायली सुरेश झांजरी यांनी 251 वृक्ष वाटले. शहरातील प्रमुख वृत्तपत्र विक्रते मयुर पांडे यांच्या निवासस्थानी महावीर जयंती उत्साहत साजरी करण्यात आली. या उत्सवात देशातील तीनशे गावातील साधू संत व जैन बाधवांनी लाईव्ह भाग घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *