Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी विद्यापीठाचा सोयाबीन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

राहुरी विद्यापीठाचा सोयाबीन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

राहुरी विद्यापीठ (वार्ताहर) –

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे विकसित केलेले केडीएस-992 हे सोयाबीन

- Advertisement -

पिकाचे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले आहे. दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा व आंध्रप्रदेश या पाच राज्यांत या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

केंद्रीय सोयाबीन वाण ओळख व प्रसार समितीची बैठक दि. 12 मार्च रोजी इंदोर येथे पार पडली असून देशाच्या विविध प्रातांसाठी एकूण आठ वाण प्रसारित करण्यात आले. यामध्ये प्रसारित झालेल्या आठ वाणांपैकी केडीएस-992 हा सर्वाधिक उत्पादन देणारा वाण ठरला असून त्याची उत्पादकता 6 क्विंटल अधिक आहे.

याशिवाय हा वाण दक्षिण भारतात पाने खाणार्‍या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील तर तांबेरा रोगास कसबे डिग्रज येथे मध्यम प्रतिकारक्षम सिध्द झाला आहे. याचे दाणे मोठ्या आकाराचे असून 100 ते 105 दिवसात हा वाण पक्व होतो. सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी हा वाण विकसित केला आहे.

अखिल भारतीय समन्वित सोयाबीन प्रकल्पांतर्गंत दि. 12 व 13 मार्च रोजी पार पडलेल्या केंद्रिय सोयाबीन वाण ओळख समितीच्या बैठकीत अध्यक्षपदी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. टी. आर. शर्मा तर सोयाबीन अनुसंधान संस्था, इंदोरच्या संचालक डॉ. नीता खांडेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. संजीव गुप्ता व इतर मान्यवर सदस्य यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या