Friday, April 26, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील लाखांवर शेतकरी मदतीपासून वंचित

जिल्ह्यातील लाखांवर शेतकरी मदतीपासून वंचित

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

तत्कालीन भाजप-सेना युती सरकारने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली होती.

- Advertisement -

त्यानंतर राज्यात सरकार बदलले असून महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तसेच नियमित पीक कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर मदत म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला वर्ष उलटून गेला तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिला आहे. दरम्यान,जळगाव जिल्ह्यासाठी 1194 कोटी, 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. परंतु 2019 च्या दिवाळीपूर्वीच जिल्ह्यासाठी केवळ 36 कोटींचा निधी अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांसाठी मंजुरी देण्यात येऊन दोन टप्प्यात वितरित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांवर एकीकडे दुबार पेरणीचे संकट आणि दुसरीकडे अतिवृष्टीचे संकट आल्यामुळे हंगामासाठी लावलेला खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आताही गेल्या तीन दिवसात दोन वेळा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शासनाकडून यापूर्वी प्रोत्साहनपर मदतीची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार तसेच 11सप्टेंबर 2020च्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र या शासननिर्णयानुसार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणे अपेक्षित होती.परंंतु शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली गेली नाही. खात्यात रक्कम जमा करावी, अशी मागणी नियमित पीक कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

प्रोत्साहनपर योजना प्रलंबित

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी पिक कर्ज थकबाकीदार झाले होते. या शेतकर्‍यांना तत्कालीन भाजप-सेना युतीच्या काळात 2017 -18 अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दीड लाख रुपये मर्यादा अंतर्गत कर्जमाफी देण्यात आली होती. तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना देखील प्रोत्साहन अनुदान देण्यात आले होते .तर सप्टेंबर 2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारकडून थकीत कर्जदार शेतकर्‍यांना दोन लाख रुपये कर्जमुक्ती व प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु या शासनाकडून केवळ दोन लाख रुपये कर्ज माफी देण्यात आली असून प्रोत्साहनपर योजना अजूनही प्रलंबित आहे.तसेच नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

केवळ मोजक्याच शेतकर्‍यांना मिळाला लाभ

सरकारकडून 2019 च्या ऑक्टोबर अखेरपर्यंत अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी 1194 कोटी, 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. परंतु 2019 च्या दिवाळीपूर्वीच जिल्ह्यासाठी केवळ 36 कोटींचा निधी अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांसाठी मंजुरी देण्यात येऊन दोन टप्प्यात वितरित करण्यात आला होता. यात देखील केवळ मोजक्याच लोकांना या मदतीचा लाभ देण्यात आल्या असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या