Thursday, April 25, 2024
Homeजळगावपोलनपेठचे महात्मा ज्योतिबा फुले नगर होणार नामांतर

पोलनपेठचे महात्मा ज्योतिबा फुले नगर होणार नामांतर

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले. इंग्रजाच्या गुलामीतून (English slavery) देश स्वातंत्र्य (Freedom) झाला तरीही इंग्रजाळेली प्रवृतीमुळे आजही आपण पारतंत्र्यात असल्याचा भास होतोय. ही मानसिक गुलामी मोडीत काढण्यासाठी महापालिका,(Municipal Corporation) केशव क्रीडा मंडळ(Keshav Krida Mandal) आणि खान्देश माळी महासंघाच्या (Khandesh Mali Mahasangha) पुढकाराने पोलनपेठचे (Polanpeth) क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेनगर (Mahatma Jyotiba Phule Nagar) नामांतरण (Renaming) सोहळा 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता चित्राचौक येथे अन्न पुरवठा व नागरी संरक्षणमंत्री ना. छगनराव भुजबळ व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन माजी नगरसेवक किशोर भोसले (Kishor Bhosle)यांनी गुरुवारी गोलाणी मार्केटमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

यावेळी खान्देश माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संतोष इंगळे, प्रदेश सचिव वसंत पाटील, प्रदेश सहसचिव अरुण चौधरी, जिल्हाध्यक्ष गजानन महादेव आदी उपस्थित होते.

भोसले पुढे म्हणाले की, फुले दाम्पत्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात नेवून ज्ञानज्योत पेटविली. त्यांचे नाव जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील पोलनपेठ ऐवजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेनगर करण्यासाठी महापालिकेकडे 2011 रोजी ठराव केलेला आहे. आतापर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सर्व सोपसकार पूर्ण करण्यात आले असून शुक्रवारी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेनगर नामांतरण सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला अन्न पुरवठा व नागरी संरक्षणमंत्री ना. छगनराव भुजबळ, पालकमंत्री गुलाबराव पाटील,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन,उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा स्थायी सभापती राजेंद्र घुगेपाटील, आयुक्त सतीश कुळकर्णी, नगरसेवक नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर राखी सोनवणे, नगरसेविका ज्योती तायडे, नगर अभियंता अरविंद भोसले, सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेविका सरीता नेरकर, माजीनगरसेवक किशोण भोसले आदीमान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या नामांतर सोहळ्यानंतर या परिसराच्या सुशोभीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुद्धा करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. या नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जळगाव महापालिका, केशव क्रीडा मंडळ आणि खान्देश माळी महासंघाचे पदाधिकारी काम करीत आहे. कमी वेळेत ही तयारी पूर्ण केली असून त्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभत असल्याचे वसंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या