Saturday, April 27, 2024
Homeनगरमहर्षी विद्यामंदिर शाळेची आरटीई विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी वसुली

महर्षी विद्यामंदिर शाळेची आरटीई विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी वसुली

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महर्षी विद्यामंदिर शाळेकडून आरटीईमध्ये मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी वसूल करण्यात येत असून यासंबंधीची तक्रार कोपरगाव पंचायत समिती येथील शिक्षण विभागाकडे सचिन मलीक यांनी केली आहे.

- Advertisement -

महर्षी विद्यामंदिर शाळेची पहिलीची फी 30 हजार 600 रुपये, सेक्युरिटी फी 11 हजार 200 रुपये अशी एकूण 41 हजार 800 रुपये फी असून त्यापैकी शासनाचे आरटीईचे 8 हजार रुपये वजा करून उर्वरीत 33 हजार 800 रुपये भरल्याशिवाय अ‍ॅडमिशन मिळणार नाही, असे शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले असल्याचे मलिक यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.आरटीई म्हणजे मोफत सक्तीचा शिक्षण हक्क कायदा यामध्ये 25 टक्के विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेने मोफत शिक्षण देणे शासनाने बंधनकारक केले असताना त्या विद्यार्थ्यांची फी ही प्रतीपूर्ती स्वरूपात शासन शाळांना देत असते.

परंतु सदर शाळा ही एकूण फी पैकी प्रतीपूर्तीची रक्कम म्हणजे 8000 रुपये वजा करून उर्वरीत 33800 पालकांकडून वसूल करत आहे. तसेच या व्यतीरिक्त बस फी 8 हजार 400 व पुस्तकांची फी 4 हजार 100 भरण्यास सांगत आहे. बस फी व पुस्तकांची रक्कम पालक भरण्यास तयार आहेत परंतु वरील 33 हजार 800 शाळा पालकांकडून का वसूल करते हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधी कोपरगाव शिक्षणविभागाकडे तक्रार केली असता कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलटपक्षी कोपरगाव शिक्षणाधिकारी यांनी सांगितले की शाळा उर्वरीत फी वसूल करू शकते. जिल्हा शिक्षणाधिकारी यांना फोन केला असता अशाप्रकारे शाळा फी वसूल करू शकत नाही.

यासंबंधी सचिन मलीक यांनी पंचायत समिती बी.डि.ओ, पंचायत समिती विस्तारअधिकारी, पंचायत समिती शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी , डेप्युटी डायरेक्टर इत्यादिंशी संपर्क केला तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडे लेखी तक्रार देखील दिली परंतु कुठलीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. 30 जून ही आरटीई प्रवेशासाठी शेवटची मुदत असताना शाळा प्रवेश नाकारत आहे. तसेच शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नाही. यातून संबंधित शाळा व शिक्षण विभाग यांचे काही साटेलोटे तर नाही. शिक्षण विभागाने याकडे गांभिर्याने बघावे किंवा आरटीई कायदाच रद्द करावा जेणेकरून पालकांची फसवणूक होणार नाही, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या