Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार 'आघाडीवर'

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ‘आघाडीवर’

औरंगाबाद- मराठवाडा पदवीधर निवडणुकीची मतमोजणी अत्यंत धिम्या गतीने सुरू असून आतापर्यंत 40 हजाराच्या आसपास मतांची मोजणी झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 27 हजार 879 तर भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांना 10 हजार 173 मते मिळाली आहेत.

पुणे पदवीधर मतमोजणीतील प्राथमिक कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मुसंडी मारली आहे. भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.

- Advertisement -

अमरावती : अमरावती विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाची पहिली फेरी, भाजपचे नितीन धांडे यांना जबर धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 3131 मतांसह आघडीवर आहेत.र महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना 2300 आणि शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांना 2078 मते मिळाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या