एसटी महामंडळात कामगार कपात नाही

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई |Mumbai – करोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक संकट निर्माण झाले असून, आर्थिक भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) मागील वर्षी भरती केलेल्या कर्मचार्‍यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र, हे वृत्त राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांनी फेटाळून लावलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे कर्मचार्‍याच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील. यासंबंधी मीडियातून फिरत असलेल्या बातम्या चुकीच्या असून, कोणत्याही कर्मचार्‍याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

आर्थिक खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं 2019 मध्ये भरती करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त होतं. त्यामुळे एसटीतील कर्मचार्‍यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर परब यांनी या प्रकरणावर विस्तृत भूमिका मांडली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *