Wednesday, April 24, 2024
Homeनगरस्वाध्याय उपक्रमात नगर दुसर्‍या स्थानावर

स्वाध्याय उपक्रमात नगर दुसर्‍या स्थानावर

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्या (Maharashtra State Council for Educational Research and Training) वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वाध्याय उपक्रमात (Swadhay Activities) अहमदनगर जिल्हा राज्यात द्वितीय (Ahmednagar district is second in the state) स्थानावर असून नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील 2 लाख 21 हजार 269 विद्यार्थ्यांनी पाचव्या आठवड्यात स्वाध्याय पूर्ण केले आहे.

- Advertisement -

दर शनिवारी राज्य परिषद च्या वतीने ऑनलाईन स्वाध्याय (Online Swadhay on behalf of the State Council) सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना एका विषयावरची साधारण पंधरा प्रश्न देण्यात येतात. या उपक्रमाला मागील वर्षी सुमारे 74 हजार विद्यार्थ्यांनी (Student) प्रतिसाद दिला होता. यावर्षी 90 लाख विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत नोंदणी केली आहे. राज्यात सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून तेथील दोन लाख तीन हजार 119 विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवण्यास आरंभ केला आहे. हे प्रमाण शेकडा चाळीस दशांश दहा इतके आहे. अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) पाचव्या आठवड्यात स्वाध्याय प्रक्रिया सुरू केलेल्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण सुमारे 24 टक्के इतके आहे. नगर जिल्हा (Ahmednagar District) राज्यात दुसर्‍या स्थानावर असून जळगाव जिल्ह्यात 23 दशांश 55 टक्के विद्यार्थ्यांनी स्वाध्याय (Swadhay) सोडविला असून जिल्हा तिसर्‍या स्थानावर आहे.

10 टक्के पेक्षा कमी प्रतिसाद नोंदविल्या जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वात कमी प्रतिसाद नोंदविलेल्या जिल्ह्यांत मुंबई शहर (Mumbai) असून हे प्रमाण 0.03 टक्के इतके आहे. रायगड (Raygad), पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindhudurg), वर्धा (Vardha), गोंदिया (Gondiya), नाशिक (Nashik), नंदुरबार (Nandurbar), मुंबई (Mumbai), उपनगर पुणे (Pune), लातूर (Latur), भंडारा (Bhandara), गडचिरोली (Gadchiroli) या जिल्ह्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तर अमरावती (Amravati), नांदेड (Nanded), ठाणे (Thane), जालना (jalna), रत्नागिरी , धुळे, नागपूर या जिल्ह्यांचे प्रमाण अडीच टक्के पेक्षा कमी आहे. कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा केली आहे. सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्याचे प्रमाण 10 टक्के पेक्षा कमी असून यवतमाळ जिल्हा बारा टक्क्यावर आहे. औरंगाबाद जिल्हा 20.25 टक्के, चंद्रपूर जिल्हा 13.14 टक्के विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमाला प्रतिसाद नोंदविला आहे.

उत्तर महाराष्ट्रात नगर

उत्तर महाराष्ट्रात समाविष्ट असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख 21 हजार 269, जळगाव जिल्हा दोन लाख चार हजार 805, धुळे जिल्हा 6456 नंदुरबार 1738, नाशिक जिल्हा सहा हजार सहाशे दोन विद्यार्थ्यांनी प्रतिसाद नोंदविला आहे. कोकण विभागात ठाणे, पुणे विभागात सातारा, औरंगाबाद विभागात औरंगाबाद, नागपूर विभागात चंद्रपूर व अमरावती विभागात यवतमाळ हे जिल्हे आघाडीवर आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद च्या वतीने देण्यात येणार्‍या स्वाध्याय उपक्रमांतर्गत पाचव्या आठवड्यात अहमदनगर जिल्हा राज्यस्तरावर दुसर्‍या स्थानी आलेला आहे. याही पुढे अधिकाअधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करणार आहे. उत्तर विभागात नगर जिल्हा प्रथम क्रमांकावर असला तरी ते स्थान सातत्याने कायम ठेवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. यासंदर्भात शिक्षकांना अधिकधिक विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय लिंक पाठविण्याबाबत या सूचना देण्यात आली आहे.

-शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यभर दर शनिवारी ऑनलाईन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. सुमारे 90 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात नोंदविला गेला असला तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्वाध्याय सोडून शिक्षणाशी जोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्हा स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यी स्वाध्याय सोडतील या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असणार आहे .शाळांनी उत्तम प्रतिसाद दिल्यास नगर जिल्हा कायमच प्रथम स्थानावरती राहू शकेल.

-डी. डी. सूर्यवंशी, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या