Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra SSC Result 2021 : जाणून घ्या यंदाच्या दहावीच्या निकालाची वैशिष्ट्य

Maharashtra SSC Result 2021 : जाणून घ्या यंदाच्या दहावीच्या निकालाची वैशिष्ट्य

मुंबई | Mumbai

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (Corona Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या (Maharashtra SSC Exam) परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे.

- Advertisement -

दहावीचा निकाल जाहीर; कशी असेल अकरावी प्रवेशाची प्रक्रिया? जाणून घ्या

अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीच्या परिक्षेचा निकाल लावण्यात आला आहे. दहावीचा विक्रमी निकाल असून ९९.९५ टक्के इतका आहे. यंदाही दहावीच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९९.९६ टक्के इतकी आहे. मुलांची टक्केवारी ९९.९४ टक्के असून राज्यातील २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. सन २०२१ चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत ४.६५% जास्त आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८२८०२ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८२६७४ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी ७४६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी १०.२५ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६% असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२% ने जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ % लागला आहे.

SSC Result 2021 : जाणून घ्या, नापास होणारे 0.05 टक्के विद्यार्थी आहेत तरी कोण?

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६४८६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६९८८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१८०७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ९३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील २२७६७ शाळांतून १६५८६१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२३८४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २८४२४ एवढी अर त्यांच्या निकालाची टक्केवारी ९७.४५ आहे.

एकूण ७२ विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये २७ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे. तसेच सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (१००%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९९.८४ %) आहे.

SSC result दहावीत सर्वच विद्यार्थी पास, असा पाहा तुमचा निकाल

विभागीय मंडळ निहाय निकाल

पुणे : ९९.६५ टक्के

नागपूर :९९.८४ टक्के

औरंगाबाद :९९.९६ टक्के

मुंबई :९९.९६ टक्के

कोल्हापूर :९९.९२ टक्के

अमरावती :९९.९८ टक्के

नाशिक : ९९.९६ टक्के

लातूर :९९.९६ टक्के

कोकण :१०० टक्के

- Advertisment -

ताज्या बातम्या