Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं संकट; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं संकट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात पावसानं थैमान घातले आहे (Maharashtra Rains Alert). राज्याच्या अनेक भागात महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळल्याने अनेक लोक मृत्यूमुखी झाले आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यावर लोकांनी सुटकेचा श्वास घेत असतानाच महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.

- Advertisement -

येत्या तीन दिवस कोकण (Kokan), गोवा (Goa), मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून २९ आणि ३० जुलैला या भागात अतिशय जोरदार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratanagiri), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि सातारा (Satara) या ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात (Yellow Alert) आला आहे.

उत्तर बंगालच्या खाडीवर आणखी एक चक्रवाताचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा परिणामामुळे उत्तर बंगालची खाडी आणि त्याच्या आजूबाजूला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या दोन चक्रवातांमुळे २९ जुलैपर्यंत जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश, उत्तरांखड, पंजाब, हरयाणा, चंदिगड आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर काही भागांमध्ये अधिक जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर याची तीव्रता कमी होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या