Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रRain Update : अतिवृष्टीचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामान अंदाज

Rain Update : अतिवृष्टीचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामान अंदाज

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारीही राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

अरबी समुद्रात महाराष्ट्र, गोव्याच्या किनाऱ्यालगत असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) रत्नागिरी आणि पणजीच्या दरम्यान किनाऱ्याला धडकून जमिनीवर येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ईदच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; पोलिस अधिकाऱ्यासह 34 ठार, अनेक जखमी

मुंबई, मध्य महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळणार आहेत. हवामान विभागाकडून कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट), रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात (यलो अलर्ट) आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

Crime News : पत्नीनेच केला पतीचा खून केला; भावाच्या मदतीने काढला काटा

- Advertisment -

ताज्या बातम्या