Thursday, April 25, 2024
HomeनाशिकNarhari Zirwal : सत्ता संघर्षाच्या हायव्होल्टेज निकाला आधी झिरवाळ होते कुठे? वाचा...

Narhari Zirwal : सत्ता संघर्षाच्या हायव्होल्टेज निकाला आधी झिरवाळ होते कुठे? वाचा सविस्तर…

नाशिक | Nashik

आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर आता काही तासांमध्ये निकला हाती येण्याची शक्यता आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र त्यानंतर ते नाशिकमध्ये आले आहेत. एवढचं नव्हे तर त्यांनी सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

- Advertisement -

Sanjay Raut : ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ…; राऊतांचे ट्विट चर्चेत

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari ZIrwal) हे आज सकाळपासून उपस्थित असून सकाळी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे ते नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र खुद्द नरहरी झिरवाळ यांनी आपण कुठेही गेलेलो नाही, जाण्याचा प्रश्न नाही. आज नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाच्या एका इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम असल्याने शहरातच असणार आहे. याच सुमारास नरहरी झिरवाळ हे कार्यकर्त्यांबरोबर मिसळीचा आनंद घेताना दिसून आले आहे. ते म्हणाले कि, मी नॉट रिचेबल नव्हतो… तर इथेच होतो. सत्ता संघर्षाच्या निकालावर माझ्यासह देशभरातील जनतेचे लक्ष आहे, त्यामुळे कुठेही जाणार असल्याचे झिरवाळ म्हणाले…

Maharashtra Satta Sangharsh : थोड्याच वेळात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाचे वाचन

आज सत्तासंघर्षाचा निकाल आहे. आजचा निकाल हा त्या १६ आमदारांना अपात्र ठरवणारा असेल. १६ आमदार अपात्र होतील. एकनाथ शिंदेंचाही अपात्र आमदारांमध्ये समावेश आहे. त्यामुळे सरकार कोसळेल असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

राऊतांचे सुचक ट्विट

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!’ अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर जवळपास अकरा महिन्यानंतर आज निकाल लागणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या