Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Lockdown: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक

मुंबई

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखे कडक पाऊल उचलण्याशिवाय पर्याय नाही, असे मत शनिवारच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले. त्या पार्श्वभूमीवर आज कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवार किंवा मंगळवारी लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळत आहे.

- Advertisement -

राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत नोंदवल्याची माहिती मिळत आहे. अशातच राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाइन बैठकीत संवाद साधला. प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली. तसेच राज्यात लॉकडाऊन न केल्यास १५ एप्रिलनंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी शक्यता वर्तवली.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

संजय राऊत यांच्याकडूनही लॉकडाऊनचे संकेत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनला दुसरा पर्याय आहे का? असा सवाल केला. लोकांचा जीव वाचणं महत्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर, नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्यास राज्यातील विरोधी पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल देखील त्यांनी केला. संजय राऊत यांच्या संवादातून महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या