Friday, April 26, 2024
Homeनगरमहाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तालुकास्तरीय निवड चाचणी

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तालुकास्तरीय निवड चाचणी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी

- Advertisement -

नगर तालुका तालीम सेवा संघाच्यावतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे नगर तालुकास्तरीय निवड चाचणी उत्साहात पार पडली. यावेळी मल्लांचे रंगतादार कुस्त्यांचे सामने रंगले होते. करोना महामारीमुळे तब्बल एक वर्षानंतर गावात कुस्तीचा आखाडा रंगल्याने ग्रामस्थ व कुस्ती रसिकांनी कुस्ती मल्लांना उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.

नवनिर्वाचित सरपंच रुपाली विजय जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून व कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष नाना डोंगरे, उपसरपंच अलका गायकवाड, देवाचे भगत नामदेव भुसारे, उद्योजक गोकुळ जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, हर्षवर्धन कोतकर, डॉ. विजय जाधव, सचिव बाळू भापकर, एकनाथ जाधव, किरण जाधव, पोपट शिंदे, भागचंद जाधव, कोंडीभाऊ फलके, रंगनाथ शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या निवड चाचणीत तालुक्यातील मल्लांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विजयी मल्ल गादी विभागसाठी महेश शेळके, बुध्दभूषण साळवे, सौरभ शिंदे, संदीप डोंगरे, वैभव फलके, अविनाश मोरे, लौकिक चौगुले, युवराज कर्डिले, माती विभागसाठी वैभव चोपडे, सौरभ मराठे, अक्षय उघडे, विकास गोरे, शुभम वाघ, सुजीत कांडेकर, मनोज फुले तर महाराष्ट्र केसरी गटासाठी मनोहर कर्डिले (माती) व सुदर्शन कोतकर (गादी) हे मल्ल जिल्हा निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहेत. या निवडचाचणीसाठी पंच म्हणून गणेश जाधव व प्रियंका डोंगरे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या