Friday, April 26, 2024
Homeनगरमहाराष्ट्राचा कबड्डी संघ अंतिम फेरीत दाखल

महाराष्ट्राचा कबड्डी संघ अंतिम फेरीत दाखल

भेंडा |वार्ताहर| Bhenda

हरियाणा (Haryana) येथे सुरू असलेल्या 69 व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत (69 National Kabaddi Championship Tournament) हरियाणा संघावर 6 गुणांनी मात करीत महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. भेंड्याच्या (Bhenda) शंकर गदाई व राहुल खाटीकचा महाराष्ट्र संघात समावेश असल्याने भेंड्यात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) भेंडा (Bhenda) येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्र व कला महाविद्यालयाचे डोअर स्टेडियममध्ये 1 ते 15 जुलै या कालावधीत झालेल्या निवड चाचणी शिबिरात 69 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप 2022 साठी महाराष्ट्राचा पुरुष कबड्डी संघाची निवड करण्यात आली होती.

भेंड्याचे जिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी शंकर गदई व राहुल खाटीक यांचे सह मयूर कदम (रायगड), असलम इनामदार (ठाणे ), आकाश शिंदे (नाशिक), अरकम शेख (मुंबई उपनगर), शेखर तटकरे (रत्नागिरी), सिद्धेश पिंगळे (मुंबई शहर), अक्षय उगाडे (मुंबई शहर),किरण मगर (नांदेड), देवेंद्र कदम (धुळे ), अक्षय भोईर (ठाणे) खेळाडूंचा संघात समावेश आहे.तर शंकर गदाई हा महाराष्ट्र संघाचा कर्णधार आहे.

दि. 21 जुलै पासून हरियाणा (Haryana) येथे ही राष्ट्रीय चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धा (National Kabaddi Championship Tournament) सुरू आहे. आज दि.24 रोजी महाराष्ट्र व हरियाणा संघात उपांत्य फेरीचा अटीतटीचा सामना झाला. त्यात महाराष्ट्र संघाने 33/27 असा 6 गुणांच्या फरकाने हरियाणा (Haryana) वर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच दि.24 रोजी रात्री अंतिम सामना होणार असून भेंडा (Bhenda) वासियांचे या सामन्याकडे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या