Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना लसीमुळे साईड इफेक्टस?; राजेश टोपेंकडून महत्त्वाची माहिती

करोना लसीमुळे साईड इफेक्टस?; राजेश टोपेंकडून महत्त्वाची माहिती

मुंबई | Mumbai

राज्यात करोनाचं लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सीरम इंन्स्टिट्यूटकडून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचे डोस पोहोचवले जात आहेत. दरम्यान, लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती आहे.

- Advertisement -

राज्यात १६ तारखेला सकाळी ९ वाजल्यापसून प्रत्यक्ष लस देण्याच्या कामाला प्रारंभ होईल. मात्र, करोनाची ही लस घेतल्यानंतर काही किरकोळ दुष्परिणाम (Side effects) जाणवू शकतात. असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपे म्हणाले, करोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी दिली. करोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना केले.

महाराष्ट्राला लसीचे कमी डोस मिळाले

महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा मोठा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. “पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले आहेत,” असं राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. यासोबत केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

“आपल्याला केंद्र सरकारने एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. बफर स्टॉकसहित बोलायचं गेल्यास आपल्याला १७ ते साडे सतरा डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. केंद्र सरकाराच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण डोस द्या. त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेच ५५ टक्के डोस आलेल आहेत. त्यामुळे आठ लाख लोकांचं लसीकरण करायचं असतानाही आम्हाला ५५ टक्के म्हणजेच साधारण पाच लाखांपर्यंत लसीकरण पूर्ण करणार आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या