Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर ; असा करा ऑनलाईन अर्ज

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर ; असा करा ऑनलाईन अर्ज

मुंबई / Mumbai – दहावीच्या निकालानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सीईटी परीक्षेसाठी आजपासून (19 जुलै) विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, अकरावी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नाही. परंतु अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना सीईटी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.

- Advertisement -

तसेच दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना सीईटीसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार नाही. एसएससी बोर्ड वगळता इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र शुल्क भरावे लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक –

http://cet.mh-ssc.ac.in

कशी असेल सीईटी परीक्षा?

सीईटी परीक्षा एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असून 100 गुणांची परीक्षा असेल. ओएमआर पद्धतीने परीक्षा होणार असून दोन तासांची परीक्षा असेल. इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्‍न असतील. परीक्षा केंद्रांची यादी एसएससी बोर्ड किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.

अकरावी प्रवेशाचे निकष काय?

सीईटी परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. सीईटी परीक्षा देणार्‍यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य असणार असून त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार होणार आहे.

काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे ई-मेल आयडी

Region Email ID

Mumbai [email protected]

Pune [email protected]

Nagpur [email protected]

Nashik [email protected]

Aurangabad [email protected]

Amravati [email protected]

- Advertisment -

ताज्या बातम्या