Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबँक ऑफ महाराष्ट्र तर्फे ‘आयमा’ सभासदांशी संवाद

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे ‘आयमा’ सभासदांशी संवाद

सातपूर । प्रतिनिधी Satpur

महाराष्ट्र बँक ही अग्रगण्य बँक असून उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. उद्योजकांनी काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. उद्योजकांनी महाराष्ट्र बॅँकेच्या सुविधाचा लाभ घ्यावा व उद्योगांचा विकास करावा, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक (झोनल हेड) एन. एस. देशपांडे यांनी केले.

- Advertisement -

महाराष्ट्र बॅँक संदर्भातील कर्जप्रकरणे, उद्योजकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी देशपांडे यांनी आयमा पदाधिकार्‍यांची आयमा रिक्रिएशन सेंटर येथील के. आर. बूब कॉन्फरन्स हॉल येथे बैठक घेतली. भारत सरकारने घोषित केलेल्या अ‍ॅडिशनल फायनान्स स्कीमबाबत २०% वाढीव लिमिटबाबत ग्राहकांना माहिती दिली. या स्कीमचा फायदा उद्योगधंदे वाढीसाठी होणार असून काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे देशपांडे यांनी सांगितले.

आयमा अध्यक्ष वरुण तलवार यांनी उद्योजकांच्या समस्या मांडल्या व सविस्तर चर्चा केली. बँक ऑफ महाराष्ट्राने उद्योजकांना अनेक प्रकारे मदत केली आहे. आयमा इंडेक्स, आयमा डिरेक्टरी या उपक्रमांमध्येही बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच सहभागी झाली आहे. त्यामुळे देशपांडे व इतर अधिकारी यांचे सन्मान करण्यात आला.

यावेळी आयमांचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, राजेंद्र अहिरे, ललित बुब, राजेंद्र पानसरे, योगिता आहेर, विरल ठक्कर आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी चर्चासत्रात आपल्या समस्या मांडून सविस्तर चर्चा केली. यावेळी बी. पी. इंटरप्रेसेसचे लोकेश पिचाया व रेनबो डेको प्लास्टचे अजय तावडे यांनी बँक सहकार्य करीत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या