Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता राज्याचे कृषीमंत्री दादा भूसेही 'नॉट रिचेबल'

आता राज्याचे कृषीमंत्री दादा भूसेही ‘नॉट रिचेबल’

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. एकापाठोपाठ एक आमदारांची शिवसेनेतून गळती होत आहे…

- Advertisement -

यातच आता कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. दादा भुसे यांनी शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

आणखी किती दिवस राज्यपाल रुग्णालयात?; मेडिकल बुलेटीन जारी

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केल्यानंतर आता हळूहळू एकेक आमदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या गटात जात आहे. आता थेट राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदार गुवाहाटीत दाखल झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

एकीकडे राजकीय भूकंप दुसरीकडे मंत्रालय हाऊसफुल्ल; ‘हे’ आहे कारण

दरम्यान, सध्या शिंदे गटाकडे चाळीसहून अधिक आमदारांचे (mla) संख्याबळ आहे. आज सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे त्यांच्या गटाचे पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तोपर्यंत आणखी किती आमदार आणि मंत्री शिंदे गटाला समर्थन देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या