Wednesday, April 24, 2024
Homeनगरअप्पर अधीक्षक डॉ. राठोड यांना मॅटचा दिलासा

अप्पर अधीक्षक डॉ. राठोड यांना मॅटचा दिलासा

अहमदनगर (प्रतिनिधी) –

डिझेल भेसळ प्रकरणासह वादग्रस्त ऑडिओ क्लीपने चर्चेत आलेले नगरचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना

- Advertisement -

मॅट न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. आठ दिवसांत नियुक्तीचे आदेश काढा, असे निर्देश न्यायालयाने गृहविभागाला दिले आहे.

डॉ. दत्ताराम राठोड यांची नगरला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. पदभार हाती घेताच डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केले होते. या पथकाने नगर शहरात संशयित बनावट डिझेलवर छापा टाकला होता. हा छापा संशयाच्या भोवर्‍यात सापडला होता. दरम्यानच्या काळता डॉ. राठोड व नेवासा पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी संभाजी गर्जे यांच्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. यानंतर डॉ. राठोड यांची बदली करण्यात आली होती. काही कालावधीत अन्यायकारक बदली झाल्याने न्याय मिळण्यासाठी डॉ. राठोड यांनी मॅट न्यायालयात धाव घेतली. बदली विरोधात दावा दाखल केला. मॅट न्यायालयाने डॉ. राठोड यांना योग्य त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, तसे नियुक्तीचे आदेश गृहविभागाने काढावे, असे निर्देश दिले आहेत. यामुळे डॉ. राठोड यांना दिलासा मिळाला आहे.

………………….

- Advertisment -

ताज्या बातम्या