Thursday, April 25, 2024
Homeनाशिकचंदनपुरीत खंडोबाचा येळकोट

चंदनपुरीत खंडोबाचा येळकोट

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोनाची (corona) वाढती रूग्णसंख्या व शासकीय निर्बंधांच्या सावटामुळे यंदाही श्रीक्षेत्र चंदनपुरी (Shrikshetra Chandanpuri) येथील खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव (Khanderao Maharaj Yatrotsav) रद्द करण्यात आला असला तरी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पौष पौणिमेनिमित्त छोटेखानी पालखी मिरवणूक महापूजेने (mahapuja) यात्रा पर्वास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर आणि भंडार्‍याच्या उधळणीने चंदनपुरी नगरी न्हाऊन निघाली.

- Advertisement -

चंदनपुरीत दरवर्षी पौष पौणिमेपासून 15 दिवस महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव अपूर्व उत्साहात साजरा केला जातो. मात्र गत दोन वर्षापासून करोना संकटामुळे यात्रोत्सव रद्द केला जात असल्याने भाविकांसह व्यावसायीकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि. 17) सकाळी 7 वाजता राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) व सौ. अनिता भुसे (anita bhuse) यांच्या हस्ते तळी भरून महाआरती करण्यात आली.

तसेच ना. भुसे व भाजपनेते (BJP) सुनील गायकवाड (sunil gaiwad) यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. यावेळी वाघ्या-मुरळींसह पारंपारिक संबळ वाद्याच्या गजरात भंडार्‍याची उधळण करीत देवाच्या मुखवट्यांची छोटेखानी पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत माजी कृउबा सभापती बंडूकाका बच्छाव, चंदनपुरीचे सरपंच विनोन शेलार, उपसरपंच अशोक अहिरे, जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतिश पाटील, डी.एफ. पाटील, भीमराव शेलार, मनोहर जोपळे, बाबाजी सोनवणे, संजय पवार, कैलास शेलार, सचिन पाटील आदिंसह ग्रा.पं. सदस्य व मोजके भाविक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित सर्वांना मास्क वाटप करण्यात आले.

दरम्यान, प्रथेप्रमाणे श्रीक्षेत्र जेजुरी (Jejuri) कडेपठार येथून पवित्र मशाल ज्योत प्रज्वलीत करून आणण्यासाठी सूर्यवंशी भगत परिवाराचे रामकृष्ण सूर्यवंशी, सदाशीव सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, रत्ना सूर्यवंशी, अलका सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, अर्चना सूर्यवंशी, बापू अहिरे, पोपट पवार, जिजाबाई पवार हे गेले होते. त्यांचे काल सायंकाळी मनमाड चौफुली येथे पवित्र ज्योतीसह आगमन झाल्यानंतर चंदनपुरीपर्यंत ज्योतीची करोनाचे निर्बंध पाळत छोटेखानी मिरवणूक काढण्यात आली.

करोनाचे (corona) संकट व शासकिय निर्बंधांमुळे यात्रोत्सव रद्द झाल्यामुळे नेहमीच्या यात्रा परिसरात कुठलीही खेळणी-पाळणे आदी मनोरंजनाची साधने तसेच व्यावसायीक दुकाने थाटण्यात आलेली नाहीत. भाविकांना दर्शनासह धार्मिक विधी पार पाडण्यासाठी मात्र जय मल्हार ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे तळी भरण्यासाठी सुरक्षित अंतराच्या निकषाने मोजके वाघ्या-मुरळी तसेच नारळ, फुलहार, बेल-भंडारा व प्रसादाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमार्फत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून मंदिर परिसरात स्वछता ठेवण्यात येणार आहे.

शासनाच्या करोना प्रतिबंधक नियमावलीनुसार मंदिराच्या गाभार्‍यात भाविकांना टप्या-टप्याने व मोजक्या संख्येने प्रवेश दिला जाईल. मंदिर परिसरात जास्त गर्दी होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल. तसेच भाविकांनी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे, ते तपासूनच मंदिरात प्रवेश दिला जाईल. भाविकांनी कोविड नियमांचे पालन करतांना मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करावे.

विनोद शेलार सरपंच, चंदनपुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या