Friday, April 26, 2024
Homeनगरमहापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची...

महापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी!

राहाता | तालुका प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डीत महापशुधन एक्सपोत पहिल्या दिवशी हरियाणातील १२ कोटी रुपये किंमतीचा पंधराशे किलो वजनाचा मुरा जातीचा दाराइंद्र नामक रेडा तसेच अंबाजोगाई येथील संजाब प्रजातीचा ५१ लाख रुपये किंमतीचा पवन नामक सफेद रंगाचा घोडा व दीड ते दोन फूट उंचीच्या मेंढ्या हे प्राणी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या पशुपालक तसेच नागरिकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरले. या प्राण्यांना बघून प्रत्येकाच्या मनात आश्चर्याची भावना निर्माण होत होती व हातातील मोबाईल फोन सेल्फी साठी पुढे सरसावत होते

- Advertisement -

विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणा-या शिर्डीतील श्री साईबाबांच्या पावन भूमीत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने प्रथमच देशातील सर्वात मोठा महापशूधन एक्सपो २०२३ प्रदर्शन भरविण्यात आला आहे. दिनांक 24 ते 26 या कालावधीत संपन्न होणाऱ्या या महा पशुधन एक्सपोला भेट देण्यासाठी पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या एक्सपोचा जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना नागरिकांना लाभ मिळावा तसेच येथून नवनवीन तंत्रज्ञान व पशुधनाच्या प्रजातींची माहिती शेतकऱ्यांनी घेऊन जावी, तेथे आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यंत चांगले नियोजन केले असून शेकडो बसेस नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल

या प्रदर्शनात बारा राज्यातील विविध पशुंच्या ८९ प्रजाती सहभागी झाल्या आहे.यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना नवनवीन पशुंच्या प्रजाती तसेच शेतीपूरक व्यवसायास जोड मिळावी या हेतूने सुमारे ७०० ते ८०० प्राणी याबरोबरच २७ लिटर दुध देणारी मुरा जातीच्या म्हशीचा समावेश आहे. या म्हशींची किंमत ७ लाखांपासून १२ लाख रुपयांपर्यंत असल्याचे हरियाणातील शेतकरी प्रदिप सिंग यांनी सांगितले.

महापशुधन एक्सपोच्या मैदानात कृषीमंत्री सत्तारांची राजकिय फटकेबाजी

तर दाराइंद्र नामक रेडा हा साडेतीन वर्षाचा असून त्याचे वजन १३०० किलो असून तो १२ कोटी रुपये किंमतीचा आहे. या रेड्याचा दैनंदिन आहार दोन हजार रुपयांचा असल्याचे त्यांनी म्हटले. तर अंबाजोगाई येथील संजाब प्रजातीचा ६५ प्लस पवन नामक सफेद रंगाचा घोडा तीन वर्षाचा असून त्याची किंमत ५१ लाख रुपये असल्याचे मालक अमोल लोमटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या घोड्याने कोल्हापूर येथील कन्हेरी मठात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

त्याचप्रमाणे सांगोला येथील शेतकऱ्याचा आणखी एक खिलार प्रजातीचा सफेद रंगाचा चौसा बैल देखील प्रमुख आकर्षण ठरला. या एका बैलाची किंमत पाच लाख रुपये एवढी होती. दिड फूट उंचीच्या मांद्या प्रजातीच्या दोन सफेद करड्या रंगाच्या मेंढ्यांना पहाण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. महा एक्सपोमध्ये मोठं मोठ्या पॅडांलमध्ये विविध प्रजातींचे बैल,घोडे गायी, शेळ्या, बोकडे, मेंढ्या, सातपुडा कोंबडी, कोंबडे, बदकं, दुध उत्पादनासाठी लागणारे साहित्य व माहिती, फळे, भाज्या, बि- बियाणे, आदिसह अनेक पशुसंवर्धन व शेतीविषयक स्टॉल लावण्यात आले असून पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने शेतकरी व नागरीकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

अण्णा लष्करे हत्येतील ५ आरोपींची जन्मठेप कायम

रेडा, घोडा, बैल तसेच दीड ते दोन फूट उंचीच्या मेंढ्या यांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची झुंबड उडाली होती. चिमुकले, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी तसेच महिला व पुरुष बांधवांनी महा पशुधन एक्सपोमध्ये या प्राण्यांच्या जवळ उभे राहून सेल्फी घेत होते. अनेकांना आपल्या मोबाईलमध्ये या प्राण्यांचे फोटो कैद करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे प्रदर्शन बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल या प्राण्यांना बघितल्यानंतर काही क्षणात कॅमेरा मोडवर जाऊन फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग साठी सज्ज होताना दिसत होते.

पहिल्याच दिवशी या पशुधन एक्सपोला लाखोंची हजेरी लागली. ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक शेतकरी अबाल वृद्धांना सुद्धा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या प्राण्यांबरोबर आपले फोटो काढून घेत अविस्मरणीय क्षण म्हणून कॅमेरात बंदिस्त केले आहे. मंत्री महोदयांनी सुद्धा प्राण्यांबरोबर आपला फोटो काढून एक आनंदी क्षण कॅमेरा टिपला आहे

कारने दुचाकीला ७० फूट नेलं फरपटत, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत महागड्या कार आपणास नेहमीच आकर्षित करतात आपल्यासाठी लक्षवेधी ठरतात. त्यानंतर या कारची किंमत किती असेल याची चर्चा आपापसात होते. मात्र सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असलेल्या कार पेक्षाही कित्येक पट किमतीचे रेडे व घोडे तसेच बैल असतात याची जाणीव हे प्रदर्शन बघितल्यानंतर प्रकर्षाने होते. त्याचबरोबर एखाद्या अधिकाऱ्याचे पगाराची दररोजचे हजेरीच्या चार-पाच पट रक्कम या प्राण्यांच्या आहारावर व देखरेखीवर खर्च होते हे सुद्धा एक नवलच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या