Friday, April 26, 2024
Homeनगरनिरर्थक चिंतन दु:खाला कारण- महंत रामगिरी

निरर्थक चिंतन दु:खाला कारण- महंत रामगिरी

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

मन जर निरर्थक चिंतन कक्षप लागले तर ते दु:खाला कारण आहे. धावणारे मन आहे. त्याला गुंतविण्यासाठी भगवत चिंतन हा मार्ग आहे, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील केलवड येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता, 42 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्याप्रसंगी महाराज बोलत होते. केलवडकर ग्रामस्थांनी या सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन केले.

यावेळी रामगिरी महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज मनाला भ्रमराची उपमा देतात. मन सैराट धावते, हा जीव सुख समजून संसारामध्ये अनेक ठिकाणी फिरतो आणि अनुभव मात्र दु:खाचा येतो. हताश होतो, म्हणून आपले संत भक्तीमार्ग सांगतात. विशेषत: गोकुळातील गोपींची असलेली भक्ती! काय त्या गोपींचे प्रेम होते, जे प्रेम शब्दांनी व्यक्त होत नाही असे प्रेम त्या गोपींचे होते. जेव्हा त्या परमात्म्याचे दर्शन झाले. पुण्य पुरुषाच्या दर्शनात समाधान असते.

काहींचे दर्शन झाले तर कामच होत नाही. काहींच्या चेहेर्‍यावर हास्य नाही, भगवंताच्या चेहेर्‍यावर हास्य आहे. रंभेच्या रुपावर मोहित न झालेले शुक्राचार्य भगवान कृष्णाच्या रुपावर मोहित झाले. वृंदावनातील वृक्षही भाग्यवान आहेत. त्यांनी भगवंताचे रुप पाहिले. गोपिकांनी त्या परमात्म्याला पाहिले. अन सर्व जगाचा विसर पडला. परमार्थात चित्त फार महत्त्वाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या