Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामहामंडलेश्वर झाले पदवीधर

महामंडलेश्वर झाले पदवीधर

नाशिक | प्रतिनिधी

येथील यशवंतराव चव्हाण महाराषट्र मुक्त विद्यापीठाने अनेकांना शिक्षणाची कवाडे खुली केली आहेत. यामुळेच आपण पदवी प्राप्प करू शकलो असे प्रतिपादन बेझे येथील श्रीरामपीठाचे अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले….

- Advertisement -

४५ वर्ष वय असणार्‍या स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती यांनी येथील यशवंतराव चव्हाण महाराषट्र मुक्त विद्यापीठातून कला शाखेतील इतिहास या विषायाची पदवी प्रथम वर्गाने प्राप्त केली आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन व संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी त्यांची भेट घेत सत्कार केला.

यावेळी बोलताना स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती म्हणाले, काही कारणांनी शिक्षण काही वर्षापासून अर्धवट राहिले होते. भक्तीमार्गात आमचे ग्रंथ परायण, ग्रंथ अभ्यास तर होत होता परंतु शिक्षण अपुर्ण राहिल्याची खंत होती. ते शिक्षण पुर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठाने दिली. बेझे येथील आश्रम परिसरात मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करून या भागातील शिक्षण अपुर्ण राहिलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगीतले.

स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती यांनी यापुर्वीच रामनाम माझी साधना, रामनामाची अमृतधारा या ग्रंथांचे तीन खंड, श्रीगुरू अमृत गाथा हे ग्रंथ लिहुन पुर्ण केले आहेत. तर डॉ. बाबावाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र्यावर भीमरायाची अमृतगाथा तर छत्रपती शिवराय यांच्या जीवनावरील शिवरायांची अमृत गाथा या ग्रंथांची निर्मिती ते करत आहेत.

आपल्या शिक्षणाचा या ग्रंथसंपदेसाठी मोठी मदत होईल असे त्यांनी नमुद केले. तसेच यापुर्वी श्रीरामपीठाच्या वतीने कुपोषण मुक्ती, स्वच्छ त्र्यंबक, कोवीड काळात ईद काळात मालेगावी गरिबांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये आता शिक्षण प्रवाहापासून वंचीतांना मुक्त विद्यापीठाच्या वतीने शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या