Friday, April 26, 2024
Homeनगरबस व मोटारसायकलचा अपघात; एक ठार

बस व मोटारसायकलचा अपघात; एक ठार

वैजापूर |ता. प्रतिनिधी| Vaijapur

गंगापूर-वैजापूर रोडवर (Gangapur Vaijapur Road) महालगांवजवळ (Mahalgav) बस व मोटारसायकलचा अपघात (Bus Bike Accident) होवुन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू (Death) झाला असुन तर एक गंभीर जखमी (Injured) झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 17) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. कृष्णा नांगरे (वय 28 रा. महालगाव) या युवकाचा जागीच मृत्यू (Death) झाला तर कैलास सोमवते (रा. महालगाव) गंभीर जखमी झाला.

- Advertisement -

वैजापूर : कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

सविस्तर महिती अशी की, महालगाव (Mahalgav) येथुन गंगापूरच्या (Gangapur) दिशेने मोटारसायकल (एमएच 20 जीए 4926) जात असतांना समोरुन गंगापूरकडून वैजापूरकडे येणार्‍या वैजापूर (Vaijapur) आगाराची बसची (एमएच 40 एन 9738) समोरासमोर धडक झाली. यात मोटारसायकलवरील दोघेही युवक गंभीर जखमी झाले. त्यांना विरगांव पोलिसांनी (Virgav Police) वैजापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असता डॉक्टरांनी कृष्णा नांगरे यास मृत घोषीत केले.

समृध्दी महामार्गावर बर्निंग कारचा थरार

उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले तर दुसरा गंभीर जखमी कैलास सोमवते याला पुढील उचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेची विरगांव पोलिसात नोंद झाली असुन पुढील तपास विरगांव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नवनाथ कदम, विजय बाम्हदे, गुणवंत थोरात करीत आहे.

‘त्या’ युवकाच्या मृतदेहाचे पुणे येथे शवविच्छेदन

- Advertisment -

ताज्या बातम्या