Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरीत महिला सुविधा केंद्र सुरू

राहुरीत महिला सुविधा केंद्र सुरू

राहुरी (तालुका प्रतिनिधी) –

राहुरी शहरात एसव्ही ग्रुपच्या विद्यमाने व शिवप्रतिष्ठानच्या सौजन्याने सुरू झालेल्या शासकीय मान्यताप्राप्त महिला सुविधा

- Advertisement -

केंद्राचा शुभारंभ संपन्न झाला.

महिला सुविधा केंद्राचे उदघाटन पुणे विद्यापीठ सिनेट सदस्या तथा माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, विद्यमान नगराध्यक्षा अनिताताई पोपळघट, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पवार, शिवशाहीर विजय तनपुरे, राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कानडे, जिल्हाध्यक्ष अशोक कानडे, न्यायाधीश हर्षदा आदमाने, शिवप्रतिष्ठानचे डॉ. प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास डॉ. सुचेता कुलकर्णी, लता कांबळे, क्षीरसागर, सौ.गोरे, सुरेखाताई देवरे, अलका सोनवणे, योजना लोखंडे, रजनी धमाळ, वैशाली नहार, मोरेताई, रामभाऊ काळे, मारुती मोरे, आप्पासाहेब ढूस आदींसह मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रकाश पवार यांच्या शिव प्रतिष्ठान देसवंडीचे सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस व्ही ग्रुप, सरस्वती प्रतिष्ठान व विद्यानिकेतन अध्यक्षा मनिषताई पोटे, विद्याताई क्षीरसागर, वर्षाताई गागरे, पाठक यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या