Thursday, April 25, 2024
Homeनगरमाजीमंत्री महादेव जानकर यांची श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थानला भेट

माजीमंत्री महादेव जानकर यांची श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थानला भेट

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

एखाद्या रेडीमेड संस्थानचा मठाधिपती, मालक होणे अन् स्वत: संस्थानची निर्मिती करून मठाधिपती होणे हा इतिहास अंडबंगनाथ संस्थानच्या रूपाने वारकरी संप्रदायात अरूणनाथगिरी महाराज यांनी निर्माण केला असल्याचे गौरवोदगार राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांनी श्रीक्षेत्र अंडबंगनाथ संस्थान येथे दर्शन भेटीत मनोगत व्यक्त करताना काढले.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठच्या भामाठाण शिवारातील श्रीक्षेत्र अंडबंगनाथ संस्थान हे नाथ संप्रदायातील एक मोठे संस्थान म्हणून अलीकडच्या काळात ओळखले जाऊ लागले आहे. या संस्थानची महती ऐकून माजी पशुसंवर्धन, दुगधविकास मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाचे सहकारी कार्यकर्ते समवेत भेट देऊन दर्शन घेतले. कोविड नियमांचे पालन करत असल्याने गेली दोन महिन्यांपासून अरूणनाथगिरी महाराज हे संस्थानवरच होते. त्यांनी आपल्या विद्यार्थी शिष्य गणांसमवेत जानकर यांचे स्वागत केले.

संस्थानबद्दल मनोगत व्यक्त करताना महादेव जानकर पुढे म्हणाले की, नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नवनाथ कालीन या संस्थानचे आणि अरूनाथगिरी महाराज यांचे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने मी स्वागत करतो. या ठिकाणचा माणिक शेतकर्‍यांचा तपशीलेचा इतिहास मी नवनाथ ग्रंथात वाचला आहे. या संस्थानचे सुरू असलेले विकासाचे काम अजोड आहे. रामायण, नवनाथ, महाभारत या ग्रंथाचे वाचन अध्ययन केल्याशिवाय हिंदू धर्माचं जीवन परिपूर्ण होत नाही. अरूणाथगिरी महाराज यांना गुरू सद्गुरू नारायणगिरी महाराज (श्री क्षेत्र सरालाबेट) यांच्या आशिर्वादाने हरियाणासह अनेक ठिकाणच्या संस्थांनवर संधी येऊनही त्यांनी नकार देत इथेच रममान होत सेवा करण्याचा निर्णय घेतला. काही शिक्षण नसताना संत गाडगेबाबा यांच्याप्रमाणे मोठे वैभव निर्माण केले. याचा मला आनंद वाटतो.

आपण नेता म्हणून येथे आलो नसून आपल्या सारखाच ब्रम्हचारी परंतू राजकीय आहे. 32 वर्ष झाली मी घरी गेलो नाही. आपला शिष्य या नात्याने आदेश द्या, या संस्थानच्या रस्ते व इतर समस्या दुर करण्याचे काम सत्ता नसतानाही शासकीय पातळीवर अवश्य पाठपुरावा करील. राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता लवकरच येवो, अशी सदिच्छाही शेवटी जानकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंदारे, चोरमारे शास्त्री महाराज यांचाही संस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या