Friday, April 26, 2024
Homeनगरमहाबीज कर्मचारी पाच दिवसांपासून संपावर

महाबीज कर्मचारी पाच दिवसांपासून संपावर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

सातवा वेतन प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई इतर कर्मचार्‍यांचे श्रेणी वेतनवाढ आश्‍वासीत प्रगती योजना लागू करणे, चतुर्थ श्रेणी

- Advertisement -

कर्मचार्‍यांची निवृत्तीची वयोमर्यादा 58 वरून 60 करणे व इतर मागण्या शासनाच्या वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. त्या मागण्यांसाठी येथील महाबीज कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे.

भारतात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून टाळेबंदी असताना प्रतिकूल परिस्थितीत महाबीज कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांचे हित जोपासत 100 टक्के उपस्थिती देऊन खरीप 2020 हंगामात राज्यातील शेतकर्‍यांना निर्धारित वेळेत पेरणीकरिता उपलब्ध करून दिलेले आहे. तरी सुद्धा सतत मागणी करुनही 7 वा वेतन प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई इतर कर्मचार्‍यांचे श्रेणी वेतनवाढ आश्‍वासीत प्रगती योजना लागू करणे, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची निवृत्तीची वयोमर्यादा 58 वरून 60 करणे व इतर मागण्या शासनाच्या वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. महाबीज ही स्वायत्त संस्था असून शासनाकडून कुठलेही वेतन व तद अनुषंगीक अनुदान घेत नसल्यामुळे व महामंडळाने 7 व्या वेतन आयोगापोटी आर्थिक तरतूद केली असल्याने त्याचा शासनाच्या तिजोरीवर कुठलाही आर्थिक भुर्दंड पडणार नाही, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. एमआयडीसी खंडाळा महाबीज येथील देवानंद ढोकणे, संदीप ओरोकार, पुंडलीक सब्बनवाड, ज्योती वाघमारे, अभिजीत सावंगीकर, कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक संचालक. आदी कर्मचारी दिनांक 9 डिसेंबरपासून संपावर गेले आहेत. या संपाला महाराष्ट्र सर्वोद्योग कामगार कर्मचारी युनियन मुंबई संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. कामगार नेते नागेश सावंत, राजेंद्र भोसले, भरत जाधव, ताराचंद अलगुडे, दत्ता म्हसे, नजीर शेख, पडुळ गायकवाड, सुखदेव गावडे, बाळू पगारे, रवींद्र कुलकर्णी, शोभा रुपनर आदी संपात सहभागी झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या