Thursday, April 25, 2024
Homeनगरमहाडीबीटी असून अडचण नसून खोळंबा!

महाडीबीटी असून अडचण नसून खोळंबा!

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

महाडीबीटी योजना असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली असून मार्च महिन्यातील योजनांचे अनेक शेतकर्‍यांना अनुदान जमा झाले नाही. तर काही शेतकर्‍यांना 22 महिन्यानंतरही अनुदान जमा होण्याची प्रतिक्षा करावी लागत असून त्यामुळे शेतकरी या योजनेबद्दल रोष व्यक्त करीत आहे.

- Advertisement -

चार सहा गावे मिळून कृषी सहाय्यक नेमले आहे. त्यात काही कृषी सहाय्यक सरकारच्या योजना गावपातळीवर पोहचवत नाहीत. जिल्हास्तरावरून लवकरात लवकर शेतकर्‍यांना ठिबक, तुषार सिचन, ट्रॅक्टर अवजारे याचे अनुदान खात्यात जमा करावे अशी मागणी पाचेगाव, पुनतगाव व परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे. शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करावी असे आवाहा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या योजनेत शेतकर्‍यांना अडचणी येत असेल तर कृषी मंत्र्यांच्या स्वप्नांतला समृद्ध शेतकरी कधी पाहायला मिळेल? अनुदान त्वरित जमा करावे अन्यथा वंचीत शेतकरी आंदोलन करतील.

– हरिभाऊ तुवर शेतकरी संघटना, पाचेगाव

इतर तालुक्याच्या तुलनेत आपल्या तालुक्यात कृषी सहाय्यक जास्त आहेत. तसेच महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ज्या शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले व त्यांना मान्यता मिळाली अशा शेतकर्‍यांची अनुदान प्रक्रिया सुरू आहे.

– दत्तात्रय डमाळे

- Advertisment -

ताज्या बातम्या