Saturday, May 11, 2024
Homeजळगावआ. किशोर पाटील यांच्या मंत्रीपदासाठी महाआरती

आ. किशोर पाटील यांच्या मंत्रीपदासाठी महाआरती

पाचोरा Pachora ( प्रतिनिधी)-

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे जळगांवी आले असता ते हिवरा नदीकाठच्या पाचोऱ्याच्या याच मंदिरात आले आणि त्यांनी सुमारे तासभर पुजा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांची जवळीक आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना पाचोरा मतदार संघात (Pachora constituency) ८० कोटी (Rs. 80 crore) रुपयांची विकास कामे (Development works) दिली. शिवाय गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे हे तब्बल पाच वेळा आ. किशोर पाटील यांच्या निवासस्थानी येवुन गेल्याने आ. किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा (Expect to get a ministerial post) व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

श्रीराम मंदिरात सकाळी ११ वाजता महाआरती करण्यात आली. आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, एमएसपी कन्स्ट्रक्शनचे मनोज शांताराम पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, न.पा. गटनेत्या सुनिता किशोर पाटील, जिप. सदस्य पदमसिंग पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर,माजी नगरसेवक बंडू चौधरी, शितल सोमवंशी, राम केसवानी, बापु हटकर, गणेश पाटील, पप्पु राजपुत, महिला पदाधिकारी मालती हटकर, स्मिता बारावकर, सुनंदा महाजन, चंदा ठाकरे, सुरेखा वाघ, विमलबाई निवार्ते, आशा जैन, आशा हटकर, प्रिती सोनवणे, गिता सुरळकर, ज्योती सोनवणे सह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी आणि शहराच्या विविध विभागातील शिवसैनिक, आमदार समर्थक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या