धक्कादायक! CBI च्या ताब्यातील तब्बल १०३ किलो सोने गायब

jalgaon-digital
1 Min Read

चेन्नई| Chennai

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीबीआय (CBI) ने जप्त केलेले १०३ किलोग्रॅम सोने गायब झाले आहे.

या सोन्याची (Gold) किंमत ४५ कोटीच्या सुमारास आहे. सीबाआयच्या सेफ कस्टडी मध्ये हे सोने ठेवण्यात आले होते. तरी देखील सोने गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आधीच देशभर बदनाम असलेल्या सीबीआयच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

सीबीआयने २०१२ मध्ये तामिळनाडूतल्या सुराणा कॉर्पोरेशनवर छापा टाकला होता. छापेपारीच्या दरम्यान सीबीआयनं १०३ किलो ग्रॅम सोनं जप्त केलं होतं. या सोन्याची एकूण किंमत ४५ कोटी होती. सीबाआयच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं हे सोनं आता गायब झालं आहे. मद्रास हायकोर्टानं (Madras High Court) या प्रकरणात तामिळनाडू सीबी-सीआयडीला (CB-CID) चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाचा सीबी-सीआयडी म्हणजेच राज्य सरकारचा गुन्हे अन्वेशन विभाग करणार आहे. सीबीआयनं या चौकशीला विरोध केला आहे. मात्र कोर्टानं कडक शब्दात फटकारले आहे. तसेच ही चौकशी एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अखत्यारित सीआयडीद्वारे केली जाईल, असं सांगितलं आहे. विशेष म्हणजे ही चौकशी 6 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयची चौकशी होण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना असेल. मात्र या घटनेमुळे देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *