Friday, April 26, 2024
Homeजळगावमध्य प्रदेश सीमा नाका स्थलांतरित

मध्य प्रदेश सीमा नाका स्थलांतरित

भुसावळ – Bhusawal – प्रतिनिधी :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशाच्या सीमा बंद करण्यासाठी अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी मध्यप्रदेश पोलीसांनी सीमा तपासणी नाके उभारले होते.

- Advertisement -

या नाक्यावर कर्तव्यास असलेल्या पोलीसांमुळे अंतुर्ली परीसरातील नागरिकांना मुक्ताईनगर, जळगाव आदी ठिकाणी जाण्यासाठी त्रास होत होता. या तपासणी नाक्यावरुन रुग्णांच्या वाहनांनाही जाऊ न दिल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या.

अंतुर्ली शिवाराची सुमारे पाचशे एकर शेत जमीन या भागात असल्याने शेतकरी, मजुर वर्ग, केळी माल पाहण्यासाठी जाणार्‍या केळी व्यापारी, मुक्ताईनगर येथे शासकीय कामासाठी जाणार्‍या नागरीकांना तपासणीत नाक्यावरील पोलीस त्रास देऊन जाऊ देत नसल्याने खा.रक्षा खडसे यांना सदर घटनेची माहीती स्थानिक नागरिकांनी दिली.

त्यांनी स्वतः अंतुर्ली फाट्यावरील तपासणी नाक्यावर येऊन शाहपुर पो.स्टे.चे पो.नि. संजय पाठक यांच्या सोबत चर्चा करुन बर्‍हाणपुरचे जिल्हाधिकारी यांच्यांशी चर्चा करुन तपासणी नाका हलवण्यास भाग पाडले.

यावेळी त्यांच्या सोबत राजु माळी, प्रशांत महाजन, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, सरपंच नरेंद्र दुट्टे, ताहेर खा, सुनिल पाटील, कैलास दुट्टे आदी उपस्थित होते.

खा. रक्षा खडसे यांच्या दणक्याने अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी असलेले मध्यप्रदेश पोलीसांचे तपासणी नाके शेवटी हलवल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. खासदार यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या